शिर्डी / विशेष प्रतिनिधी:
जगद्गुरु श्री साईबाबांजींच्या पावन नगरीतून प्रकाशित होणारे ‘दैनिक साई दर्शन’ हे नाव ऑनलाईनमुळे आज उत्तर नगर जिल्ह्याच्या घराघरात पोहोचले आहे. या दैनिकाला धडाडी, निर्भीडपणा आणि पत्रकारितेची नवी ओळख देणारे संपादक म्हणजे जितेश मनोहरलाल लोकचंदाणी.
‘डॅशिंग संपादक’ म्हणून ओळखले जाणारे जितेश यांचा पत्रकारितेचा प्रवास संघर्ष, जिद्द आणि साईंच्या कृपेने भरलेला आहे.अवघ्या काही वर्षात त्यांनी ‘दैनिक साई दर्शन’ला उत्तर नगरमधील आघाडीचे दैनिक बनवले आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण तसे माफकच पण अंगात असलेल्या वेगवेगळ्या कला म्हणजे स्वभावाचे पैलू सहवासात गेल्यावर ओळखता येतात असा हा सर्व कलागुण संपन्न व्यक्तिमत्व जितेश मनोहरलाल लोकचंदाणी यांचा जन्म शिर्डीतील एका सामान्य सिंधी व्यापारी कुटुंबात झाला. वडील मनोहरलाल लोकचंदाणी यांचे शिर्डीत छोटे दुकान. घरची परिस्थिती बेताची. पण वडिलांनी मंत्र दिला पेनात व हातात ताकद आहे, पेनाने जग जिंकता येते. जितेशचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. लहानपणापासूनच वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड.
पत्रकारितेची सुरुवात:
त्यांच्या पत्रकरीतेच्या संघर्षाचा काळ सन २०१० ते २०२६ असा आहे, अवघ्या 2५ व्या वर्षी जितेश यांनी पत्रकारितेत पाऊल टाकले.पगाराची अपेक्षा नव्हती. स्वतः ची पदरमोड करून शिर्डी सह कोपरगांव, राहाता तालुक्यात फिरून वृत (बातम्या) संकलन करायचे. दुपारी बातमी लिहून रात्री उशिरापर्यंत प्रूफ रीडिंग ते वर्तमानपत्र छपाई आणी प्रकाशित करत असे.
एका मुलाखतीत ते सांगतात, "त्यावेळी मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते. एक बातमी मिळवण्यासाठी पावसात भिजायचो, उन्हात करपायचो. पण बातमीची हुक्की कधीच गेली नाही. अन्याय दिसला की पेन सुटायचा.वाळू माफिया, अवैध धंदे, भ्रष्टाचार पाकीटमारी, शिर्डीतील गुन्हेगारी व शासकीय यंत्रणा यांच्याविरुद्ध त्यांनी अनेक धडाकेबाज बातम्या केल्या. त्यामुळे त्यांना अनेकदा धमक्या आल्या, त्यांच्यावर हल्ले देखील झाले. पण जितेश डगमगले नाहीत. "साई पाठीशी आहे, मग कसले भय?" हा त्यांचा मंत्र होता.
‘दैनिक साई दर्शन’चा जन्म: एक स्वप्नपूर्ती
२०१४ साली शिर्डीतील काही साईभक्त व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ‘दैनिक साई दर्शन’ हे वृत्तपत्र सुरू केले. उद्देश होता - साईभक्तीचा प्रसार आणि स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे. २०१६ साली हे वृत्तपत्र बंद पडण्याच्या मार्गावर होते. तरी देखील ते डगमगले नाही जाहिरात नाही, उत्पन्न नाही कुटुंबातील लोकांची जबाबदारी, त्याचवेळी जितेश लोकचंदाणी यांनी मोठे धाडस केले. मित्रांकडून उसनवारी करून त्यांनी ‘साई दर्शन’ची सुरुवात केली. लोकं हसले, "पोरगं वेडं आहे, बुडणार." पण जितेश यांचा निर्धार पक्का होता. ‘दैनिक साई दर्शन’चे डेली म्हणून पुनर्जन्म केले. कार्यालयाची ची एक खोली. टीम होती फक्त ४ जणांची. जितेश स्वतः संपादक, बातमीदार, जाहिरात मॅनेजर, वितरक सगळं एकटेच.
यशाचा मंत्र: ‘लोकल टू ग्लोबल’
जितेश यांनी दैनिकाचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्यांची रणनीती होती - ‘शिर्डी पुरतं मर्यादित न राहता, उत्तर नगर जिल्ह्याचा आवाज बनायचं.
बातमीदारीचा धडाका:
चोरी, खून, अपघात यापलीकडे जाऊन त्यांनी शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यावर लक्ष केंद्रित केले. ‘डिजिटल बोर्ड आणि तरुणाईचे मृत्यू’, ‘सेंद्रिय शेतीची चळवळ’, ‘साई संस्थानचा कारभार’, गुन्हेगारी,अवैध मोठे बांधकाम यासारख्या धडाकेबाज अग्रलेख मालिकांनी खळबळ उडवून दिली.
निर्भीड भूमिका: सत्ताधारी असो वा विरोधक, चुकीला चूक म्हणण्याची हिंमत त्यांनी दाखवली. अनेकदा जाहिराती बंद झाल्या नाकारल्या गेल्या , दबाव आला. पण तत्त्वाशी तडजोड केली नाही. "वाचक माझा मालक, बाबा माझा आधार" हे त्यांचे ब्रीदवाक्य.
तंत्रज्ञानाचा वापर:
शिर्डीतील पहिले दैनिक ज्याने वेबसाईट, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल सुरू केले. ‘साई दर्शन ई-पेपर’ मुळे परदेशातील साईभक्त वाचक जोडले गेले. बातमीचे ब्रेकिंग व्हॉट्सॲप ग्रुपवर देणारे ते पहिले संपादक.
सामाजिक बांधिलकी: दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘रक्तदान महायज्ञ’, ‘विद्यार्थी दत्तक योजना’, ‘कोविड काळात मोफत जेवण’ असे अनेक उपक्रम राबवले. त्यामुळे ‘साई दर्शन’ हे फक्त वृत्तपत्र न राहता ‘लोकचळवळ’ बनले.
. आजचे ‘दैनिक साई दर्शन’ हे शिर्डी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर तालुक्यात त्याची मोठी वाचकवर्ग आहे.
३५ पत्रकार, असा मोठा विस्तार झाला आहे
उत्तर नगर आवृत्ती, नाशिक आवृत्ती सुरू झाल्या आहेत. ‘साई दर्शन’च्या बातमीची दखल मंत्रालयापर्यंत घेतली जाते. अनेक आंदोलनांच्या बातम्या लावून जितेश यांनी शासनाला निर्णय बदलायला लावले. पुरस्कार व सन्मान यांची अपेक्षा केली नाही
इतके यश मिळूनही जितेश यांचे पाय जमिनीवर आहेत. आजही ते भल्या सकाळी ११ वाजता झोपेतून उठून कार्यालयीन काम उशिरापर्यंत सुरू करतात. स्वतः बातमी लिहितात. गावात फिरून लोकांच्या अडचणी जाणून घेतात. त्यांच्या सौभाग्यवती मिसेस लोकचंदाणी दैनिकाच्या व्यवस्थापकीय संपादक म्हणून खांद्याला खांदा लावून काम करतात. त्यांना तीन कन्यारत्न आणी एक चिरंजीव असे अपत्य आहे
वाचन, जुन्या हिंदी गाण्यांचा छंद. सुट्टीच्या दिवशी ते शिर्डी परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे वेळ घालवतात. "पत्रकारितेने मला नाव दिले, आता समाजाचे देणे फेडायचे आहे," असे ते सांगतात कधी कधी लहानग्या डब्यात असलेला खाऊ इतरांना हि देतात त्यावेळी असलेली भावमुद्रा महाभारतातील कर्णा पेक्षाही कमी आहे असे वाटत नाही,
पुढील भावी वाटचाल
जितेश यांचे स्वप्न आहे की ‘दैनिक साई दर्शन’ने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावे. लवकरच पुणे, मुंबई आवृत्ती सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच ‘साई दर्शन डिजिटल’ या नावाने न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल अधिक सक्षम करणार आहेत. ग्रामीण पत्रकारांसाठी प्रशिक्षण ॲकेडमी सुरू करून ‘गाव तिथे बातमीदार’ ही संकल्पना राबवायची आहे. "खरा भारत खेड्यात आहे, आणि खेड्याचा आवाज बुलंद करणारा पत्रकार घडवायचा आहे," असे ते ठामपणे सांगतात. दैनिकाचा मालक-संपादक बनतो, ही कथा नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. जितेश लोकचंदाणी यांनी सिद्ध केले की जिद्द, प्रामाणिकपणा आणि साईंचा आशीर्वाद असेल तर कोणतेही शिखर गाठता येते.
त्यांच्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वामागे आहे बातमीची भूक, अन्यायाची चीड आणि वाचकांप्रती निष्ठा. ‘पेनातून क्रांती’ घडवणारे जितेश मनोहरलाल लोकचंदाणी हे खऱ्या अर्थाने ‘शिर्डीचा डॅशिंग संपादक’ ठरले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय!
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

