व्याहाळी शाळेत प्रवेशोत्सव व नवागतांचे उत्साहात स्वागत
*जिल्हा परिषद शाळेत मुले घालण्याचा कल वाढला = रणजीत भोंग पंचायत समिती सदस्य इंदापूर*
व्याहाळी, ता. इंदापूर : पुणे मॉडेल स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहाळी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थी स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग यांचे सह शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांच्या उपस्थितीत औक्षण करून, तिलक लावून आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह यावेळी विशेष आकर्षण ठरला. सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
प्रवेशोत्सवानिमित्त गावातून विद्यार्थ्यांची आकर्षक प्रभातफेरी काढण्यात आली. फुग्यांनी सजविलेल्या *ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून विद्यार्थ्यांनी आनंदी सहभाग नोंदवला.* "शिक्षण हेच भविष्याचे दार" हा संदेश देत ग्रामस्थांना आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर लावंड उप शिक्षक तात्याराम धायतोंडे , खुशाली धायतोंडे , कैलास गावडे , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तानाजी सूर्यवंशी , किशोर गायकवाड , सुनील शिंदे , तानाजी चितारे, पालक , महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाबरोबरच संस्कार, सहकार्य आणि प्रगतीची कास धरण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष हेगडे यांनी केले.

