संत सोपान काका,॓ सुंदर माझी शाळा ,या अभियानांतर्गत एन ई एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर शाळेचा तृतीय क्रमांक .
इंदापूर - निमसाखर: स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त संत सोपान काका,॓ सुंदर माझी शाळा ,या अभियानांतर्गत सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये साधारण पाच जिल्ह्यातील चार हजार 32 शाळांचा समावेश होता. इंदापूर तालुक्यातील एन ई एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रसंगी यावेळी धनंजय रणवरे, नंदकुमार रणवरे , मुख्याध्यापक . रणवरे सी .जी. सौ शेंडे मॅडम, तोरणे सर, मलगुंडे सर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर , भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , शिक्षक आमदार रंजन डावखरे , मा.आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विविध शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

