shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खंडांबे : जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा उत्साहात ; टाळ मृदंगाच्या गजरात आरोग्य आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश...!!

खंडांबे खुर्द :  जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा उत्साहात ; टाळ मृदंगाच्या गजरात आरोग्य आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश...!!

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
रविवार ता. २६/०७/२०२६

बैलगाडीतील दिंडी मिरवणूक मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ; पुरुषांसह महिला पालकांचीही उपस्थिती लक्षणीय..!!

खडांबे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील आनंददायी शनिवार विविध उपक्रमातून साजरा..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा पार पडला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, सांस्कृतिक वारसा आणि परंपरा तसेच वेशभूषा ही लहान मुलांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम राबविण्यात आला. याच बरोबर आरोग्य शिबीर, वृक्षसंवर्धनाचे महत्व  हे बालचमूंच्या या  दिंडीच्या माध्यमातून विषद करण्यात आले.
         शाळकरी मुले आणि मुली यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून टाळ मृदंगाच्या आणि ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात हरिनामाच्या या दिंडीसोहळ्यामध्ये  पावसाळ्यात होणारे आजार त्यावरील घरगुती उपचार व घ्यावयाची काळजी या विषयावर डाॅ.केदारी,डाॅ श्रीमती सय्यद  यांनी माहिती सांगितली. तर वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. मानवी जीवनात वृक्षाचे महत्व त्यातून होणारे फायदे हे केंद्रप्रमुख  बोरुडे यांनी विषद केले.
      बालदिंडी सोहळ्याचे आयोजनातून  सर्वधर्मसमभाव निर्माण व्हावा व भेदभाव नष्ट व्हावा ही भूमिका असल्याचे मत शाळेतील शिक्षक घोलप यांनी मांडले.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी सौ.कारले  यांचेही मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाला  पालकांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बैलगाडीतील दिंडीची मिरवणूक मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली असल्याचे पाहायला मिळाले तर याकरिता शालेय व्यवस्थापन समितीसह गावातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान लाभल्याने ही मिरवणूक अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडली असल्याने पुरुषांसह महिला पालकांचीही उपस्थिती लक्षणीय होती. तर शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका देखील उपक्रमशील असल्याने खंडांबे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात यशस्वी ठरत असते म्हणून च उपस्थित पालकांनी शिक्षकांचे ही आभार मानले आहे. तर विद्यार्थाचे कौतुक केलं आहे.

    प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे,लक्ष्मण हरिश्चंद्रे,जगदिश हरिश्चंद्रे लक्ष्मण तात्या हरिश्चंद्रे,विलास कल्हापुरे, सुखदेव दुधे, हनुमंत कल्हापुरे, सोहम पारे प्रकाश पारे, आदी. भजनी मंडळासह उपसरपंच मोहन खळेकर,संदिप खळेकर, शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब शिंदे,कलर भालेकर,सीमा कल्हापुरे,वंदना कारले,हर्षदा डॉ.केदारी ,साळवे,ज्योती पाले,काळे,स्वाती रसाळ,वंदना कारले,रमीज पठाण,शिवाजी रसाळ,सचिन काळे आदी. पालक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक घोडे,श्रीमती गायकवाड यांनी प्रयत्न केले.
close