shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात रविवारी मोफत आरोग्य शिबिर

इंदापुरात रविवारी मोफत आरोग्य शिबिर
इंदापूर, ता. २३ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी (ता. २६) मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली.

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि जिल्हा बँक संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पूर्णतः मोफत दिल्या जातील. राज्यातील नामांकित डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणीसह विविध आजारांवर उपचार केले जातील. या शिबिरात केवळ तपासणीच नव्हे, तर पात्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. तसेच आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि रेशन कार्ड दुरुस्ती यांसारख्या शासकीय सुविधांचा लाभही एकाच ठिकाणी मिळणार आहे. इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या या शिबिरात हृदयरोग, कॅन्सर, किडनी आजारावर उपचार, नेत्र तपासणी, दंत उपचार, स्त्री रोग व जनरल शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या मोफत विविध शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, मोफत रक्ताच्या तपासण्या, रक्तदान शिबिर, मोफत अस्थिरोग उपचार मोफत विविध प्रकारच्या थेरपी उपचार, रेडिओलॉजी विभाग मापक दरात तपासणी, मोफत श्रवण क्षमता तपासणी, मोफत स्पीच थेरपी मार्गदर्शन करणार आहे.
close