इंदापूर: (दि. २२ जुलै २०२६):
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, इंदापूर विधानसभा यांच्या वतीने बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी शाळेतील लहान विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि इतर शालेय उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.
भाजपने वाढदिवसानिमित्त होर्डिंग्स व अनावश्यक जाहिरातबाजी न करण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या या शिस्तीचे पालन करत, जाहिरातीचा खर्च टाळून लहान मुलांच्या शिक्षणाला मदत करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व उपक्रमशीलतेने साजरा करण्यात आला.
या वेळी भाजप किसान मोर्चाचे इंदापूर विधानसभा अध्यक्ष अभिजीत घोगरे, विजय बापू घोगरे, अरुण बापू घोगरे, दादा कवडे, नागेश गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------
फोटो ओळ: बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

