shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनंतराव पवार विद्यालयाची आणि दादांची नाळ होती - दत्तात्रय घोगरे.स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त निर- निमगाव येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन.

अनंतराव पवार विद्यालयाची आणि दादांची नाळ होती - दत्तात्रय घोगरे.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त निर-  निमगाव येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन.
इंदापूर:
दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार अनंतराव पवार विद्यालयात  तीन वेळा येऊन गेले होते. आपल्या अनंतराव पवार विद्यालयाची आणि दादांची नाळ होती. असा नाळ जोडलेला नेता त्यांनी विद्यालयाच्या भूमिपूजन समारंभाला , रक्षाबंधनाला, आणि मुख्याध्यापक संघाची ढाल मिळाली होती. त्या  वितरण समारंभाला येथे आले होते. चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद मिळालेला , राज्याच्या प्रशासनावरती अतिशय पकड असलेल्या असा नेता महाराष्ट्र मध्ये पुन्हा होणे नाही. कार्यकर्त्याला भेटण्यासाठी सकाळी सहा वाजता तयार असणारा हा नेता आणि रात्री बारा वाजेपर्यंत काम करणारा असा कामाचा माणूस महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा अखंड परिश्रम घेणारा होता . असा नेता आपल्याला परत लाभणार नाही. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो असे मनोगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान निमगाव चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी अनंतराव पवार विद्यालय व प्राथमिक विद्यालय येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून शिक्षक विद्यार्थी त्यांच्यासमवेत वृक्षारोपण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांना मत व्यक्त केले. 
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोरे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक छगनपिसे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान निर - निमगाव संचलित अनंतराव पवार विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांच्या हस्ते अभिवादन करून वृक्ष लागवड करण्यात आले..
-----------------------------------
फोटो ओळ: अनंतराव पवार विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांच्या हस्ते अभिवादन करून वृक्ष लागवड करण्यात आले..
close