shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे निरनिगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी केले स्वागत.

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे निरनिगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ  व विद्यार्थ्यांनी केले स्वागत.
इंदापूर : श्री संत सोपानकाका पालखी सोहळा आज दिनांक 20 जुलै रोजी निरवांगी येथील मुक्कामानंतर रेडनी, लाखेवाडी, खराओढा करून निरनिगाव चौक   येथे दुपारच्या विसाव्याठिकाणी अर्धा तास विसावली असता समस्त ग्रामस्थ  निर -निमगाव, ग्रामपंचायत निर-निमगाव , कै. अनंतराव पवार ग्राम विकास प्रतिष्ठान निर-निमगाव यांच्यावतीने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
तसेच पालखीचे स्वागत अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय यांच्या वतीने संतांच्या वेशभूषा मध्ये विद्यार्थ्यांनी टाळ, विना, तुळस वृंदावन, पताका घेऊन पारंपारिक वारकरी वेशभूषा मध्ये विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
 तसेच अनंतराव पवार विद्यालय यांच्या वतीने पालखीचे लेझीम खेळ खेळत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केले. 
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तामामा घोगरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, निरा भीमा कारखान्याची संचालक प्रताप पाटील, निमगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जाफर मुलांनी, ग्रामसेवक सवाशे,महादेव शेंडगे,
सुरेश पवार, संजय जाधव, सुरेश जाधव, शिवाजी जाधव, सुनील निकम, कांतिलाल शिंदे,
कै. अनंतराव पवार ग्राम विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रणजीत घोगरे, सचिव अजित घोगरे, अनंतराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोरे व त्यांचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक छगन पिसे व त्यांचे शिक्षक विद्यार्थी गावातील लहान थोर स्त्री व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या प्रमाणात अन्नदान  वारकऱ्यांना करण्यात आला. तसेच प्रतापराव पाटील यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले तसेच सुरेश जाधव मित्र परिवाराच्या वतीने 1000 भाकरी व मिरचा याचे वाटप करण्यात आले.
तसेच इतर अनेक पंचक्रोशीतील अन्नदाते यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अन्नदान केले. श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोफत तपासणी व उपचार मोठ्या प्रमाणात करण्यात आले. 
कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यावतीने पालखी सोहळा प्रमुख त्रिभुवन गोसावी व त्यांचे विश्वस्त यांचा सन्मान करण्यात आला.
-----------------------------
फोटो ओळ: श्री संत सोपानकाका महाराज पालखी निर -निमगाव चौक येथे विसावा ठिकाणी घेत असताना निर निमगाव ग्रामस्थ.
close