shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूलला न्हावी केंद्राचे केंद्रप्रमुख भोसले साहेब यांची भेट

एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूलला न्हावी केंद्राचे केंद्रप्रमुख भोसले साहेब यांची भेट
इंदापूर-पळसदेव:, बुधवार दि. 15 जुलै रोजी न्हावी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. भोसले साहेब यांनी दुपारी 2.00 वाजता एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूलला सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी शाळेतील आवश्यक कागदपत्रे, विविध शालेय नोंदी व प्रशासकीय कामकाजाची सविस्तर पाहणी केली. तपासणीअंती त्यांनी शाळेच्या शिस्तबद्ध व व्यवस्थित कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून विद्यालयाचे कौतुक केले.
भेटीच्या शेवटी मा. भोसले साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. इंगोले सर, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते मॅडम तसेच विभागप्रमुख श्री. मदने सर उपस्थित होते.
close