shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी आनंद वाघमारे याची निवड!

सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी आनंद वाघमारे याची निवड!
पळसदेव : सांगली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी महारुद्र स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमी, पळसदेव येथील बॉक्सर आनंद विठ्ठल वाघमारे याची निवड झाली आहे. आनंदची एलिट (Elite) कॅटेगरीतील ८५ ते ९० किलो वजन गटात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने अकॅडमीसह पळसदेव परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बॉक्सिंग क्षेत्रात सातत्याने सराव आणि मेहनत घेणाऱ्या आनंदने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळवली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनाही योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ते राज्यस्तरावर यश मिळवू शकतात, हे त्याच्या निवडीमुळे अधोरेखित झाले आहे.

या निवडीबद्दल महारुद्र स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा बॉक्सिंग प्रशिक्षक सतीश मल्हारी बनसुडे यांनी आनंदचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून अकॅडमी, पळसदेव आणि इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
close