शिक्षण क्षेत्रातील समर्पित सेवेला सलाम; श्री शिवाजी हायस्कूलच्या वतीने कृतज्ञता व्यक्त!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह | केनवड प्रतिनिधी
शिक्षण हे केवळ ज्ञानदानाचे नव्हे, तर भावी पिढी घडविण्याचे पवित्र कार्य आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन तब्बल ३४ वर्षे शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावणारे श्री शिवाजी हायस्कूल, केनवड येथील ग्रंथपाल श्री. महादेव विठ्ठल कुसळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या सेवाकाळात ग्रंथपाल म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणे, ज्ञानाची दारे खुली करून देणे आणि शैक्षणिक वातावरण समृद्ध करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
नोकरीतून निवृत्ती मिळते; मात्र सेवाभावातून कधीच निवृत्ती नसते! हाच संदेश देणाऱ्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त श्री. कुसळकर यांना भावी आयुष्यासाठी वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य व इतर समाजबांधवांनी व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांना भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करण्यात आली आहे.
श्री शिवाजी हायस्कूल, केनवड व श्री ज्ञा. चं. गोळे कनिष्ठ महाविद्यालय, केनवड यांच्या वतीने त्यांना सेवापूर्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
शिक्षणसेवेची ३४ वर्षे म्हणजे केवळ नोकरीचा प्रवास नव्हे, तर ज्ञान, निष्ठा आणि कर्तव्यपूर्तीचा प्रेरणादायी वारसा आहे!
— शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा

