परमपूज्य स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराजांच्या शुभहस्ते उद्घाटन; लवडे परिवाराच्या नव्या व्यावसायिक पर्वाला संतांचे आशीर्वाद!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा | श्रीरामपूर : श्री गणरायाचे स्मरण, दत्तगुरूंची कृपा आणि संतांच्या आशीर्वादाने श्रीरामपूर शहरात ‘श्री दत्तगुरू कृपा इलेक्ट्रिकल’ या नवीन व्यवसायाचा शुभारंभ शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर, भामाठाण येथील परमपूज्य स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते या नवीन दालनाचे उद्घाटन होणार असून, त्यांच्या पावन उपस्थितीमुळे या सोहळ्याला धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठान लाभणार आहे.
या मंगलप्रसंगी युवा उद्योजक श्री दिनेश पुजारी, कार्तिक सोलंकी व प्रियांका दिनेश पुजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बेलापूर रोड, वॉर्ड क्रमांक ७, लवडे वस्ती, समृद्धी टायर्स शेजारी, श्रीरामपूर येथे हा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रामाणिक कष्ट, ग्राहकांचा विश्वास आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धा या त्रिसूत्रीच्या बळावर लवडे परिवाराने नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे. केवळ व्यवसाय नव्हे, तर ग्राहकसेवा आणि विश्वासाचे नवे नाते निर्माण करण्याचा संकल्प या माध्यमातून व्यक्त होत आहे.
या शुभारंभ सोहळ्यास नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या व्यावसायिक वाटचालीस शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन शिवाजी सहादू पाटील लवडे, अशोक सहादू लवडे, तन्मय शिवाजी लवडे व समस्त लवडे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सद्गुरूंचा आशीर्वाद, कष्टाची साथ अन् ग्राहकांचा विश्वास; याच बळावर श्री दत्तगुरू कृपा इलेक्ट्रिकलची वाटचाल यशोशिखर गाठो, अशा शुभेच्छा शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत.
000

