shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भगवानबाबा मल्टिस्टेट संचालकाच्या अटकेनंतर ठेवीदारांच्या पैशांचा परतावा कधी मिळणार? महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर

ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत 
माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीने
मेजर कृष्णा सरदार यांची मागणी 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
भगवान बाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील इतर ठेवीदारांना त्यांच्या हक्काची व कष्टाची रक्कम परत मिळावी यासाठी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याने या प्रकरणातील एक  संचालक मयुर वैद्य यांस एलसीबीच्या माध्यमातून शिरूर येथे अटक करण्यात झाल्याची बातमी समोर आल्यानंतर आता उर्वरित संचालकांचे व ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार?  हा अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.


भगवान बाबा मल्टीस्टेट मध्ये अनेक सामान्य नागरिक ,ज्येष्ठ नागरिक, आजी माजी सैनिक, यांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तसेच भविष्यातील कौटुंबिक गरजांसाठी बचत केलेले पैसे ठेवीच्या स्वरूपात जमा केले होते, यामधे माजी सैनिकांचा देखील समावेश असल्याने व ठेवीची रक्कम मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याने अनेक ठेवीदार आर्थिक विवचनेत सापडले असल्याने या प्रकरणात ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा सन 2025 मध्ये पुढाकार घेऊन समितीच्या वतीने श्रीरामपूर परिसरातील संबंधित ठेवीदारांच्या प्रश्नाला वाचा फोडत जिल्ह्यामध्ये अनेक शाखा असुनही सर्वात अगोदर भगवान बाबा मल्टीस्टेटच्या संचालकावर सन 2025 ला विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यानंतरही ठेवीदारांना त्यांच्या रक्कम परत मिळाव्यात दोषीवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि ठेवीदारांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जावी यासाठी समिती प्रयत्नशील आहे. परंतु यामध्ये अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या वतीने देखील तब्बल सहा महिन्याचा कालावधी एफ आय आर दाखल करण्यात लागला व त्यानंतर संचालक मयुर वैद्य आपल्या परिवारासह  सहा महिने शासन आणि प्रशासनाला गुंगारा देण्यात सफल झाला, अखेर एलसीबी ने शिरूर येथे अटक केली ही तर फक्त एकाच संचालकास अटक करण्यात आली आहे इतर संचालकांचे काय ? व ठेवीदारांच्या पैशांचे काय?  या साठी एकाच संचालकाला अटक करून चालणार नाही तर इतरही सर्व संचालक बॉडीला तात्काळ अटक व्हावी आणि श्रीरामपूर मधील शाखेचे प्रबंधक प्रवीण संजय म्हसे रा. गोंडेगांव त्या व्यक्तीने 18% व्याजाचा परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवून आपले नातेवाईक सगेसोयरे मित्रपरिवार यांना मोठ्या प्रमाणात गुंतवण्याचे काम केलेले आहे त्यामुळे त्यालाही तात्काळ अटक होऊन त्याची फसलेली प्रॉपर्टी सील करण्यात यावी व संस्था तसेच संचालक बॉडीच्या नावावर जी  प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी तात्काळ सील करण्यात यावी कारण तिच व्यक्ती श्रीरामपूरकरांना मोठ्या प्रमाणात फसवणारी आहे तसेच ठेवीदारांनी जमा केलेल्या रकमेचा शोध घेऊन कायद्यानुसार जे शक्य असेल त्या  उपाययोजनाद्वारे त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी आवश्यक आहे कायदेशीर प्रक्रियेनुसार ठेवेदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत का? असे अनेक प्रश्न ठेविदारकडून उपस्थित केले जात आहे. भगवान बाबा मल्टीस्टेटच्या प्रकरणातील सर्व ठेवीदार यांच्या तक्रारीची नोंद घेऊन तपासाला गती द्यावी अशी मागणी विशेषता ज्येष्ठ नागरिक माझी सैनिक आणि सामान्य कुटुंबांनी आपल्या भविष्यासाठी जपून ठेवलेली रक्कम अडकली असल्यास त्यांच्या अडचणींचा सहानुभूती पूर्वक विचार शासन आणि  प्रशासनाच्या वतीने व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
         संचालकाला झालेली अटक तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असली तरी सामान्य नागरिकांचा मुख्य प्रश्न ठेवीदारांच्या रकमा परत देण्याचा आहे, आता संबंधित संपूर्ण संचालक बॉडीला अटक करून ठेवीदाराची एकूण 4539900 रक्कम तातडीने परत न केल्यास माजी सैनिक संघर्ष समिती व ठेविदारांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना रितसर निवेदन देऊन तातडीने ठेवीदारांची रक्कम तात्काळ देण्यात यावी अन्यथा श्रीरामपूर सह जिल्हाभर जन आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाचे असेल असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
close