shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीर वडार एकता फाउंडेशनच्या संघटनात्मक बांधणीला अहिल्यानगर जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद!.

वडार समाजाच्या एकजुटीचा नवा अध्याय; वीर वडार एकता फाउंडेशनच्या संघटनात्मक विस्ताराने अहिल्यानगर जिल्ह्यात नवचैतन्य!

संस्थापक अध्यक्ष विजयदादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत संघटनेची मजबूत बांधणी; महिला, युवक, तालुका व शहर कार्यकारिण्यांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा निर्धार!

पुणतांबा येथे महाराष्ट्रातील पहिल्या फलकाचे उत्साहात अनावरण;समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक सहभागातून नव्या पर्वाची सुरुवात!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह | विशेष वृत्त

पुणतांबा / अहिल्यानगर : समाजाला दिशा देण्यासाठी नेतृत्व लागते, नेतृत्वाला बळ देण्यासाठी संघटन लागते आणि संघटनेला यशस्वी करण्यासाठी निःस्वार्थी कार्यकर्त्यांची फळी उभी राहावी लागते. याच विचाराला मूर्त स्वरूप देत वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या वीर वडार एकता फाउंडेशनने अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीचा नवा अध्याय सुरू केला आहे.

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयदादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात महिला, युवक, तालुका, शहर आणि स्थानिक पातळीवरील कार्यकारिण्यांची बांधणी वेगाने सुरू असून, समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

केवळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यापुरती संघटनेची भूमिका मर्यादित न ठेवता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविणे, समाजबांधवांच्या अडीअडचणी सोडविणे, युवकांना रोजगाराभिमुख बनविणे, महिलांना सक्षम करणे आणि शासनदरबारी समाजाच्या न्याय्य मागण्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे, या व्यापक उद्देशाने संघटनात्मक विस्ताराला गती देण्यात येत आहे.

दरम्यान, पुणतांबा येथे वीर वडार एकता फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील पहिल्या फलकाचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या ऐतिहासिक संघटनात्मक उपक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव एकत्र आले.

अहिल्यानगर उत्तर जिल्ह्याची धुरा संपतराव गायकवाड यांच्याकडे!

वीर वडार एकता फाउंडेशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी संपतराव गायकवाड यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उत्तर जिल्हा लोकसभा अध्यक्षपदी पोपट चंद्रभान पवार, उपाध्यक्षपदी आकाश रमेश धनवटे, मुख्य संघटकपदी भरत धोत्रे, संघटकपदी रमेश दशरथ कुऱ्हाडे, कायदेशीर सल्लागारपदी ॲड. रोहित मारुती गायकवाड, सहसंपर्क प्रमुखपदी पांडुरंग (पप्पू) कुसळकर आणि जनसंपर्क प्रमुखपदी सोमनाथ जाधव यांचा समावेश आहे.


मार्गदर्शक म्हणून विष्णू मारुती गुंजाळ व भास्कर आप्पा शिंदे, तर समन्वयक म्हणून गंगा गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.

महिला सक्षमीकरणाला प्राधान्य; पूनम गायकवाड यांच्याकडे उत्तर जिल्ह्याचे नेतृत्व!


समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याची भूमिका घेत फाउंडेशनने महिला संघटनात्मक बांधणीलाही प्राधान्य दिले आहे.

अहिल्यानगर उत्तर जिल्हा महिला अध्यक्षपदी पूनम बापू गायकवाड, तर राहुरी महिला तालुकाध्यक्षपदी शकुंतला संजय डुकरे यांची निवड करण्यात आली आहे.

महिलांचे शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार, सामाजिक सन्मान आणि निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महिला कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

उत्तर जिल्हा युवक कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी!

युवकांना संघटनात्मक प्रवाहात आणण्यासाठी उत्तर जिल्हा युवक कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्षपदी अजय रामराव जाधव, संघटकपदी सागर अशोक गायकवाड आणि उपकोषाध्यक्षपदी अजय राजेंद्र कुऱ्हाडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

युवकांच्या नेतृत्वगुणांना चालना देऊन सामाजिक कार्यासाठी सक्षम युवा फळी निर्माण करण्याच्या दृष्टीने ही बांधणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

श्रीरामपूर तालुक्यात संघटनेची भक्कम फळी!

श्रीरामपूर तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रवी चंद्रकांत गायकवाड, संपर्क प्रमुखपदी कांतिलाल किसन फुलवर, कार्याध्यक्ष पदी सुरेश कचरू गायकवाड, उपाध्यक्षपदी सुनील धनवटे व बाबासाहेब गंगाराम कुसेकर, सचिवपदी संदीप रमेश गुंजाळ आणि कोषाध्यक्षपदी एकनाथ डुकरे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मुख्य संघटक संजय छबू डुकरे, संघटक दीपक विनायक गायकवाड, कायदेशीर सल्लागार ॲड. रोहित मारुती गायकवाड, विधानसभा उपाध्यक्ष दीपक वसंत मांजरे, सहसचिव शिवाजी पवार, उपकोषाध्यक्ष किशोर मारुती गायकवाड, मीडिया प्रमुख संजय रमेश फुलवर, सहसंपर्क प्रमुख शरद किसन मांजरे, जनसंपर्क प्रमुख श्रीकृष्ण वसंत डुकरे, ग्रामसंघटक प्रमुख प्रदीप वसंत गायकवाड आणि कार्यालयीन कामकाज प्रमुख सुरेभान भगवान कुसेकर यांचा समावेश आहे.

मार्गदर्शक म्हणून वसंत मांजरे, वसंत गायकवाड, शाम गायकवाड, अण्णा गायकवाड, तुकाराम मांजरे आणि चंद्रकांत कुऱ्हाडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

कार्यकारिणी सदस्य म्हणून बंडू दत्तू गायकवाड व कैलास बाळासाहेब गायकवाड यांचा समावेश आहे.

तसेच श्रीरामपूर तालुका विधानसभा अध्यक्षपदी गोरख अण्णा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

श्रीरामपूर युवक तालुका कार्यकारिणी

श्रीरामपूर तालुका युवक कार्यकारिणीमध्ये संपर्क प्रमुखपदी प्रतीक भगवान गुंजाळ, कार्याध्यक्षपदी सतीश बाळासाहेब गायकवाड, उपाध्यक्षपदी जितेश अनिल गायकवाड, सचिवपदी नितीन दत्तात्रय गायकवाड, कोषाध्यक्षपदी अक्षय दिलीप शिंदे, मुख्य संघटकपदी अविनाश कुसमाडे आणि संघटकपदी सागर शाम गायकवाड यांचा समावेश आहे.

विधानसभा अध्यक्षपदी किरण तान्हाजी मांजरे, सहसंपर्क प्रमुखपदी अनिल गायकवाड, जनसंपर्क प्रमुखपदी विजय एकनाथ गायकवाड आणि ग्रामसंघटक प्रमुखपदी सचिन विठ्ठल गुंजाळ यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

राहुरी तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग!

राहुरी तालुकाध्यक्षपदी विलास विश्वनाथ गुंजाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुका युवक कार्याध्यक्षपदी शांताराम रंगनाथ मांजरे आणि युवक मीडिया प्रमुखपदी चंद्रभान तात्याबा गायकवाड यांचा समावेश आहे.

राहुरी शहर कार्यकारिणी

राहुरी शहराध्यक्षपदी राजेंद्र हिरामण गुंजाळ, संपर्क प्रमुखपदी कैलास विश्वनाथ गुंजाळ, कार्याध्यक्षपदी अनिल सदाशिव गुंजाळ, उपाध्यक्षपदी संपत जगन्नाथ गुंजाळ, सचिवपदी लक्ष्मण अण्णा गायकवाड, सहसचिवपदी कैलास रामभाऊ गुंजाळ, कोषाध्यक्षपदी रवींद्र बाबुराव गुंजाळ आणि उपकोषाध्यक्षपदी शरद धोंडीराम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्य संघटक चंद्रकांत हनुमंता गुंजाळ, संघटक राजेंद्र भानुदास गुंजाळ, सल्लागार बाबासाहेब शंकर गुंजाळ, माहिती व प्रसिद्धी प्रमुख अनिल शंकर गुंजाळ, मीडिया प्रमुख सुरेश काशिनाथ गुंजाळ, जनसंपर्क प्रमुख श्रीकांत आसाराम गुंजाळ, ग्रामसंघटक सुनील रामलाल गुंजाळ, प्रवक्ते विष्णू रामू गुंजाळ आणि मार्गदर्शक प्रकाश मारुती गुंजाळ यांचा समावेश आहे.

राहुरी शहर युवक कार्यकारिणी

युवक अध्यक्षपदी अमोल भाऊसाहेब गुंजाळ, प्रमुख संपर्कपदी मनोज प्रकाश गुंजाळ, कार्याध्यक्षपदी कृष्णा अण्णा गुंजाळ, उपाध्यक्षपदी आदित्य विष्णू गुंजाळ, सचिवपदी महेश अर्जुन गुंजाळ, सहसचिवपदी आकाश चंद्रकांत गुंजाळ, कोषाध्यक्षपदी किरण भगवान गुंजाळ आणि उपकोषाध्यक्षपदी राहुल सोपान गुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्य संघटक अरुण वसंत गुंजाळ, संघटक विकास भानुदास गुंजाळ, सल्लागार प्रसाद भाऊसाहेब गुंजाळ, माहिती व प्रसिद्धी प्रमुख तुषार राजू गायकवाड, मीडिया प्रमुख नितीन अमर गुंजाळ, जनसंपर्क प्रमुख अतुल अण्णा पवार, ग्रामसंघटक रुपेश संपत गुंजाळ, प्रवक्ते पवन वसंत गुंजाळ आणि मार्गदर्शक विक्रम अशोक गायकवाड यांचा समावेश आहे.

राहाता तालुक्यातही संघटनेची दमदार बांधणी!

राहाता तालुकाध्यक्षपदी दीपक दत्तू कुऱ्हाडे, संपर्क प्रमुखपदी सुनील प्रकाश कुऱ्हाडे, कार्याध्यक्षपदी संजय रामू जाधव, उपाध्यक्षपदी विकास राजू कुऱ्हाडे व अमोल यादव कुऱ्हाडे, सचिवपदी राजू मारुती कुऱ्हाडे, कोषाध्यक्षपदी रवींद्र सुरेश कुसकर, मुख्य संघटकपदी दीपक गोरख धनवटे आणि संघटकपदी सुनील पवार यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

सल्लागार म्हणून दिलीप गायकवाड व रमेश जगन्नाथ धनवटे, सहसचिव सचिन मधुकर कुऱ्हाडे, उपकोषाध्यक्ष आकाश लगन पवार, मीडिया प्रमुख अरुण दीपक पवार, सहसंपर्क प्रमुख अतुल भगवान कुसळकर, जनसंपर्क प्रमुख कैलास रमेश गायकवाड, ग्रामसंघटक सतीश अशोक गुंजाळ आणि मार्गदर्शक वसंत सटवा पवार यांचा समावेश आहे.

राहाता शहर कार्यकारिणी

राहाता शहराध्यक्षपदी स्वप्निल सोमनाथ कुऱ्हाडे, कार्याध्यक्षपदी महेश विलास कुऱ्हाडे, संपर्क प्रमुखपदी साई चंद्रभान जाधव, उपाध्यक्षपदी प्रसाद लक्ष्मण कुऱ्हाडे व नितीन सुनील शिंदे, सचिवपदी दत्तू अर्जुन शिंदे, सहसचिवपदी विशाल निवृत्ती कापसे, कोषाध्यक्षपदी अविनाश रावसाहेब कुऱ्हाडे आणि उपकोषाध्यक्षपदी आकाश सुभाष कुऱ्हाडे यांची निवड करण्यात आली आहे.


मुख्य संघटक किसन रमेश कुऱ्हाडे, संघटक अजय मनोज कुऱ्हाडे, सल्लागार दत्तू रामदास कुऱ्हाडे, माहिती व प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश संतोष शिंदे, मीडिया प्रमुख योगेश संजू कुऱ्हाडे, जनसंपर्क प्रमुख विनायक ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, ग्रामसंघटक विनय रामदास कुऱ्हाडे आणि मार्गदर्शक संदीप बाबासाहेब गुंजाळ यांचा समावेश आहे.

राहाता शहर युवक कार्यकारिणी

युवक अध्यक्षपदी कृष्णा रमेश कुऱ्हाडे, कार्याध्यक्षपदी दीपक भाऊसाहेब गुंजाळ, उपाध्यक्षपदी किरण विठ्ठल गुंजाळ, सचिवपदी सचिन विठ्ठल कुसाळकर, संघटकपदी विघ्नेश संतोष शिंदे आणि मीडिया प्रमुखपदी आकाश अर्जुन गायकवाड यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

देवळाली प्रवरा येथेही वीर वडार एकता फाउंडेशनचा विस्तार!

देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी अनिल बाळू इर्ले, शहर संपर्क प्रमुखपदी गणेश रमेश गायकवाड, कार्याध्यक्षपदी गणेश राजू गर्दे, उपाध्यक्षपदी वैभव सुनील गायकवाड, मीडिया संपर्क प्रमुखपदी अविनाश नवनाथ इर्ले, कोषाध्यक्षपदी ऋत्विक दिलीप धोत्रे, संघटकपदी दादासाहेब डुकरे आणि सचिवपदी रवींद्र वसंत गायकवाड यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

पुणतांबा शहर कार्यकारिणीची घोषणा

पुणतांबा शहराध्यक्षपदी रामचंद्र विठ्ठल पवार, उपाध्यक्षपदी दिलीप रामदास गायकवाड आणि कार्याध्यक्षपदी अरविंद संजय धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणतांबा येथील संघटनात्मक बांधणीमुळे स्थानिक समाजबांधवांना संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.

पुणतांबा ठरले संघटनात्मक एकजुटीचे साक्षीदार; महाराष्ट्रातील पहिल्या फलकाचे उत्साहात अनावरण!

वीर वडार एकता फाउंडेशनच्या संघटनात्मक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या पुणतांबा येथील कार्यक्रमात फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील पहिल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी आणि समाजबांधव एकत्र आले. संघटनेचा संदेश अधिकाधिक समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

यावेळी महासचिव ब्रह्मा धोत्रे, पत्रकार रमेश जेठे, रमेश धोत्रे, शिर्डी मतदारसंघ संपर्क प्रमुख रामू धोत्रे, कार्यकारिणी सदस्य संदीप कुसळकर, सदस्य नितीन शेलार, दक्षिण जिल्हाध्यक्ष मारुती विटेकर, भरत धोत्रे, विष्णू गुंजाळ, पप्पू कुसळकर, पूनम पवार, भास्कर शिंदे, आकाश धनवटे, रमेश कुऱ्हाडे, सचिन कुसळकर, अनिल बोठे, शंकर कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे यांच्यासह पुणतांबा शहराध्यक्ष रामचंद्र पवार, अरविंद धोत्रे, दिलीप गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

केवळ पदे नकोत, समाजासाठी झटणारे कार्यकर्ते घडले पाहिजेत!

संघटनेच्या विस्ताराबरोबरच पदाधिकाऱ्यांवरील सामाजिक जबाबदारीदेखील वाढणार आहे. समाजातील गरीब, कष्टकरी, भूमिहीन, बेरोजगार युवक, महिला आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या कुटुंबांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, महिलांना आर्थिक स्वावलंबन, गरजू समाजबांधवांना शासकीय योजनांचा लाभ आणि समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासनदरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची गरज आहे.

संघटनेचे खरे सामर्थ्य पदाधिकाऱ्यांच्या संख्येत नसून समाजातील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात घडवून आणलेल्या सकारात्मक बदलात असते.

प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपले पद हा अधिकार न मानता समाजसेवेची जबाबदारी मानली, तर गावागावांत उभी राहणारी ही संघटनात्मक फळी वडार समाजाच्या प्रगतीसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते.

विजयदादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प!

वीर वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संघटनात्मक बांधणीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळत आहे.

महिला, युवक, ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व यांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणून व्यापक सामाजिक परिवर्तन घडविण्याचा संकल्प या विस्तारातून अधोरेखित होत आहे.

वडार समाजाच्या विविध संघटना असल्या, विचार वेगवेगळे असले, तरी समाजहिताचे ध्येय एकच असले पाहिजे. वैयक्तिक मतभेदांपेक्षा सामाजिक एकजूट मोठी, पदापेक्षा कर्तव्य मोठे आणि व्यक्तीपेक्षा समाजाचे हित सर्वोच्च मानणारी कार्यसंस्कृती निर्माण होणे ही काळाची गरज आहे.

पुणतांबा येथील पहिल्या फलकाच्या अनावरणापासून जिल्हाभर सुरू झालेल्या संघटनात्मक विस्तारापर्यंतची ही वाटचाल आगामी काळात वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीला किती बळ देते, याकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.

संघटना गावागावांत पोहोचली पाहिजे; समाजातील शेवटचा माणूस सक्षम झाला पाहिजे!


एकच ध्येय — सक्षम बनू, समाज घडवू

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा

सत्य, निर्भीड व जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारी एकमेव वृत्तसेवा!

संपादक : रमेश जेठे सर

close