shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ; -ॲड. राहुल मखरे*

*महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ; -ॲड. राहुल मखरे*
*इंदापूर, प्रतिनिधी (दि. १७) :* पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदाताई देशमुख-जाधव आणि प्रा. जयंतराव आसगावकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण विभागाचे महाराष्ट्र राज्यप्रमुख ॲड. राहुल मखरे यांनी व्यक्त केला.
इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेत शुक्रवारी (दि. १६) प्रमुख कार्यकर्ते व मतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क आणि आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वय याबाबत चर्चा करून प्रचाराची रणनीती निश्चित करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व सरचिटणीस रोहितदादा पवार रविवारी (दि. १८) दुपारी ३ वाजता इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी येथे येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराला गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. मखरे यांनी केले.
यावेळी पदवीधर मतदार राजकुमार आडसकर यांच्यासह एका विद्यार्थ्याने आपले विचार मांडले. बैठकीस मोठ्या संख्येने पदवीधर, शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.
close