स्वच्छ ऊर्जा आणि सौरऊर्जा कार्यक्षमतेवर संशोधन
अहिल्यानगर / प्रतिनिधी:
स्वतंत्र संशोधक प्रमोद एस. जाधव यांच्या ‘सोलसिफ्ट’ (SolSift) या संशोधन संकल्पनेची टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘आयडियाज फॉर इंडिया २०२६’ उपक्रमात निवड झाली आहे. स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता या विषयावर आधारित या प्रकल्पातून सौरऊर्जेचा अधिक परिणामकारक वापर करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जात आहे.
वाढत्या ऊर्जेच्या गरजा आणि पर्यावरणपूरक पर्यायांची आवश्यकता लक्षात घेऊन ‘सोलसिफ्ट’ची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करून अधिक उपयुक्त सौरवीज मिळविण्यासाठी संशोधन करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.या प्रकल्पासाठी संगणकीय प्रात्यक्षिक तयार करण्यात आले असून, विविध परिस्थितींतील संभाव्य कामगिरीचा अभ्यास सुरू आहे. सध्या संशोधन संकल्पना आणि संगणकीय अनुकरणाच्या टप्प्यावर आहे. प्रत्यक्ष चाचण्यांद्वारे त्याची कार्यक्षमता आणि व्यावहारिक उपयुक्तता पडताळणे हा पुढील टप्पा असेल.
या निवडीमुळे जाधव यांच्या संशोधन संकल्पनेला राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर स्थान मिळाले आहे. भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रयत्नांना हातभार लावणे आणि भविष्यात सौरऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी उपयुक्त पर्याय विकसित करणे हे ‘सोलसिफ्ट’चे उद्दिष्ट आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान
अ.नगर - 9860477869
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

