shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाची बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

बीड जिल्हाध्यक्षपदी जाबुवंत तेलंग, तर महिला जिल्हाध्यक्षपदी कुशावर्ती नागरगोजे यांची नियुक्ती

मुंबई : शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाची बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्हाध्यक्षपदी जाबुवंत तेलंग, तर महिला जिल्हाध्यक्षपदी कुशावर्ती नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रशांत पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच प्रदेशाध्यक्ष ॲड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या नेतृत्वाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये धारूर तालुकाध्यक्षपदी सतीश पोदार, तालुका उपाध्यक्षपदी प्रवीण पुंजदकेर, धारूर शहराध्यक्षपदी विशाल किंडारे, माजलगाव तालुकाध्यक्षपदी अशोक कुंडकर आणि केज तालुकाध्यक्षपदी भास्कर कुंदे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष ॲड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या स्वाक्षरीने नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करावा, तसेच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी काम करावे, असे आवाहन नियुक्तिपत्रातून करण्यात आले आहे.

या नियुक्त्यांमुळे बीड जिल्ह्यात शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे बीड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

— शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा

close