महारुद्र अकॅडमीमध्ये गुणवंत खेळाडूंचा सत्कार समारंभ पोलीस व सैन्य भरतीबाबत मार्गदर्शन
पळसदेव | दि. २ ऑक्टोबर २०२६
महारुद्र स्पोर्टस् & करिअर अकॅडमी, पळसदेव येथे दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी पालक बैठक व गुणवंत खेळाडू सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांची आतापर्यंतची शैक्षणिक, मैदानी व क्रीडा क्षेत्रातील प्रगती तसेच पोलीस व सैन्य भरतीच्या तयारीबाबत पालक व शिक्षकांमध्ये सविस्तर संवाद झाला.
कार्यक्रमास नितीन बनसुडे सर, प्राध्यापक सुधीर करगळ सर व सागर शिंदे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. संतोष लावंड, राम बोराटे, राहुल खोत, राहुल मारकड, स्वाती मुळीक, सुजाता लावंड, संगीता मारकड, राणी थोरात, रमेश लावंड यांच्यासह सर्व पालक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्रशिक्षक सतीश बनसुडे सर, सचिव आनंद वाघमारे व खजिनदार आकाश बनसुडे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे संस्थेच्या वतीने स्वागत व आभार मानण्यात आले.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक प्रशिक्षण, मैदानी सराव, लेखी परीक्षेची तयारी, शिस्त, उपस्थिती तसेच आतापर्यंत घेण्यात आलेल्या टेस्टमधील गुणांचे विश्लेषण करण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत प्रश्न व सूचना मांडल्या. तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी आवश्यक मैदानी व लेखी तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गुणवंत खेळाडूंचा गौरव
जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महारुद्र अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
- अर्णव विजय बनसुडे – प्रथम क्रमांक 🥇
- आयुष बनसुडे – द्वितीय क्रमांक 🥈
- प्रज्वल बनसुडे – द्वितीय क्रमांक 🥈
- प्रणव बनसुडे – द्वितीय क्रमांक 🥈
- वेदांत बनसुडे – द्वितीय क्रमांक 🥈
- सोहम राऊत – तृतीय क्रमांक 🥉
तसेच युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेत
आनंद विठ्ठल वाघमारे, शुभम अनिल बनसुडे आणि प्रणव काळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. 🥈
या सर्व गुणवंत खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक नियोजन, अभ्यास, मैदानी सराव व शिस्त यावर भर देण्यात आला. पालकांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अकॅडमी आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचा सकारात्मक संदेश या बैठकीतून मिळाला.
महारुद्र स्पोर्टस् & करिअर अकॅडमी, पळसदेव
“खेळ हीच आमची ओळख!”

