shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या सेवेत रमले कला अध्यापक हनुमंत खताळ

सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या सेवेत रमले कला अध्यापक हनुमंत खताळ
इंदापूर : निमसाखर गावचे रहिवासी, कार्यकुशल, एकनिष्ठ व आदर्श शिक्षक हनुमंत सदाशिव खताळ यांनी सेवानिवृत्तीनंतरही आपले शैक्षणिक व सामाजिक कर्तव्याची जाणीव जपत विद्यार्थ्यांसाठी कार्य सुरू ठेवले आहे.
खताळ हे सन १९९२ मध्ये श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीनाथ विद्यालय, वडापूरी येथे कला अध्यापक म्हणून रुजू झाले. प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर ते ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी श्रीनाथ विद्यालयाशी असलेले ऋणानुबंध कायम ठेवत १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कला अध्यापक म्हणून कोणतीही कसूर न करता आपली जबाबदारी पार पाडली.
आज रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील शाळेत शासकीय चित्रकला परीक्षा पार पडत असताना हनुमंत खताळ यांनी विशेष जबाबदारी स्वीकारून २० विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन व देखरेख केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांनी परीक्षेची जबाबदारी अत्यंत तत्परतेने पार पाडली.
सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळ देऊन केलेल्या या कार्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी हनुमंत खताळ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे उपस्थितांनी कौतुक केले.
close