shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत एल.जी. बनसुडे स्कूलच्या अर्णव बनसुडेचा प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड*

 जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत एल.जी. बनसुडे स्कूलच्या अर्णव बनसुडेचा प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड*
*पळसदेव (प्रतिनिधी) -* गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल & ज्युनिअर कॉलेज, पळसदेव (ता. इंदापूर) येथील इयत्ता 7 वीचा विद्यार्थी कु. अर्णव विजय बनसुडे याने घवघवीत यश संपादन केले आहे.
एमआयटी कॉलेज, पुणे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय १४ वर्षांखालील बॉक्सिंग स्पर्धेत त्याने ४० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अर्णवच्या या दमदार कामगिरीमुळे त्याची विभागीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *श्री. हनुमंत बनसुडे (नाना), कार्याध्यक्षा सौ. नंदाताई (नानी) बनसुडे, सचिव श्री. सुरज बनसुडे यांनी अर्णवचे मनापासून अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, प्राचार्य श्री. संजय इंगोले, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, समन्वयक सौ. तेजस्विनी तनपुरे, विभाग प्रमुख श्री. प्रवीण मदने, सौ. जयश्री लावंड, सौ. ज्योती मारकड, सौ. तनुजा फुगे व सर्व शिक्षकवृंद, क्रीडा प्रशिक्षक व पालकांनीही त्याचे कौतुक केले.

शाळा व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले की, "खेळ हीच आमची ओळख" या ध्येयानुसार शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे.
close