समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यावर विजय दादा गोरे यांचा विश्वास; निवडीचे सर्वत्र स्वागत..
राहुरी | प्रतिनिधी
वडार समाजाच्या एकजुटीसह सामाजिक बांधिलकी, तळागाळातील समाजबांधवांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या संपतराव गायकवाड यांची वीर वडार एकता फौंडेशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजय दादा गोरे यांनी ही निवड जाहीर केली.
गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी पांडुरंग लॉन्स, राहुरी येथे वीर वडार एकता फौंडेशनची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांच्या उपस्थितीत संपतराव गायकवाड यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
संपतराव गायकवाड हे गेल्या वीस वर्षांपासून वडार समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्यरत असून, समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे, शक्य त्या पद्धतीने मदतीचा हात देणे, तसेच समाजबांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. समाजातील सर्वांना समान न्याय व सन्मान मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत विजय दादा गोरे यांनी त्यांच्यावर अहिल्यानगर उत्तर जिल्ह्याची जबाबदारी सोपविल्याने समाजातून या निवडीचे स्वागत होत आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात फौंडेशनचे संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सर्वांना न्याय देण्याचे काम करणार आहे.यासाठी कटिबद्ध आहे असे संपतराव गायकवाड यांनी व्यक्त केले
बैठकीच्या आयोजनासाठी युवा नेते संदीप कुसळकर व त्यांच्या मित्रवारातील अनेक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे आदरणीय विजय दादा गोरे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
युवा नेते संदीप कुसळकर
यावेळी नांदेडचे गणपत पिटेवार, भगवान वर्षवार ,पत्रकार रमेश जेठे सर, अभिनेता राजेश ननवरे,समन्वयक ब्रह्मा धोत्रे, विक्की भाई,रमेश धोत्रे, नागेश चौगुले यांच्यासह अनेक तालुक्यांतील पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
“अहिल्यानगरमध्ये वडार समाजाची एकजूट दिसली पाहिजे”
यावेळी मार्गदर्शन करताना विजय दादा गोरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील वडार समाज अधिक संघटित व एकसंध करण्याची गरज व्यक्त केली. “अहिल्यानगर जिल्ह्यात वडार समाज एकत्रित पाहायचा आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. समाजहिताच्या कामात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. फौंडेशनचे रोपटे दिवसेंदिवस विस्तारले पाहिजे,” असा संदेश त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
"वीर वडार एकता फाँउडेशनचे मुख्य उद्देश"
जिल्हा तिथे वडार भवन बांधून तिथेच जिल्ह्यातील सर्व सुञे हलणार आहेत.या एकाच छताखाली शासनाच्या सर्व सवलती वडार समाजाला मिळवून देऊन, समाजाचे महिला सक्षमी करण, वडार समाजातील शासन दरबारी असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी दगड- खाणी, नविन मजूर सोसायटींना मान्यता मिळवून देणे, घरकुल योजना,अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक स्व -खर्चात एक वडार भवन व मोफत अँम्बूलन्स सेवा उपलब्ध करुन देण्याचा वीर वडार एकता फाउंडेशनचा मानस आहे.
समाजाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देत प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा आणि समाजबांधवांच्या प्रश्नांशी जोडलेले काम अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.संपतराव गायकवाड यांच्या निवडीमुळे वीर वडार एकता फौंडेशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली. यावेळी राहुरी तील उपस्थित बंधू भगिनींचे व सर्व कार्यकर्त्यांचे युवा नेते संदीप कुसळकर, जिल्हाध्यक्ष संपतराव गायकवाड, दिपेश पिटेकर यांनी आभार मानले.
०००

