*विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब आयोजित Science Fest विज्ञान प्रदर्शनात एल.जी. बनसुडे विद्यालयाची चमक; कु. स्वराली शेलारचा प्रथम क्रमांक*
*पळसदेव (ता. इंदापूर), दि. ३० -* विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथे आयोजित Science Fest विज्ञान प्रदर्शनामध्ये गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसदेवच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या विज्ञान प्रदर्शनात आपल्या विद्यालयातील एकूण *१७ विद्यार्थ्यांनी* उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी यावेळी *५ विज्ञान प्रतिकृती (Science Models) व ५ पोस्टर्स* सादर करून आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडवले.
यामध्ये आपल्या विद्यालयाची *इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कु. स्वराली सचिन शेलार* हिने *Poster Presentation* स्पर्धेत *प्रथम क्रमांक* पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *श्री. हनुमंत बनसुडे (नाना)*, कार्याध्यक्षा *सौ. नंदाताई (नानी) बनसुडे*, सचिव *श्री. सुरज बनसुडे*, प्राचार्य *श्री. संजय इंगोले*, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, समन्वयक सौ. तेजस्विनी तनपुरे, मार्गदर्शक श्री. ऋषिकेश गंगणे सर, श्री. विजय भिसेसर,विभाग प्रमुख श्री. प्रवीण मदने, सौ. जयश्री लावंड, सौ. ज्योती मारकड, सौ. तनुजा फुगे, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. स्वराली शेलार हिचे, सहभागी सर्व १७ विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे *हार्दिक अभिनंदन* केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 💐💐

