shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडकवासला धरणाचे पाणी रोटेशनप्रमाणे मिळावे; उजनीतून कळस ते तरंगवाडीपर्यंत उचल पाण्याची मागणीजय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मारकड यांचे माझी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांना निवेदन.

खडकवासला धरणाचे पाणी रोटेशनप्रमाणे मिळावे; उजनीतून कळस ते तरंगवाडीपर्यंत उचल पाण्याची मागणी
जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मारकड यांचे माझी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र  पवार यांना निवेदन.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कळस, रुई, बाबीर ते तरंगवाडी परिसरातील गावांना उजनी धरणातून उचल पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच खडकवासला धरणाचे पाणी नियोजित रोटेशनप्रमाणे मिळावे, अशी मागणी जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मारकड यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन मारकड यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन दिले. निवेदनात खडकवासला धरणाचे पाणी इंदापूर तालुक्यात येत असले, तरी मागील काही काळात पाणी वितरणातील अनियमितता आणि नियोजनाच्या अभावामुळे कळस, रुई, बाबीर ते तरंगवाडी परिसरातील शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेवर मिळावे, यासाठी संबंधित विभागाला आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उजनी धरणातून कळस, रुई, बाबीर ते तरंगवाडीपर्यंतच्या गावांसाठी उचल पाण्याची व्यवस्था झाल्यास परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
close