shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भीमाचे 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट -हर्षवर्धन पाटील -गळीत हंगाम शुभारंभ संपन्न

निरा भीमाचे 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट  -हर्षवर्धन पाटील 
-गळीत हंगाम शुभारंभ संपन्न 
इंदापूर : प्रतिनिधी दि.5/10/26
                                                चालु ऊस गळीत हंगाम दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती होत असल्याने, आपणा सर्वांना हा हंगाम एकजुटीने जास्तीत जास्त गाळप करून यशस्वी करावयाचा आहे.  निरा भीमा कारखान्याचे चालू गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 5) दिली.
    शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचा सन 2026-27 च्या 26 व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन तसेच गळीत हंगामाचा शुभारंभ राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते साधेपणाने संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील होत्या.
    हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, तीव्र दुष्काळी संकटाचा फटका हा साखर उद्योगाला चालू वर्षीचा गळीत हंगाम व पुढील वर्षीच्या गळीत हंगाम असा सलग 2 गळीत हंगामात बसेल, अशी चिन्हे दिसत आहेत. दुष्काळामध्ये पाणी टंचाईचे संकट मोठे असून, गांभीर्याने सर्वांनी एकत्र येत पाऊले उचलावी लागणार आहेत. साखर उद्योगाला दिलासा मिळावा याकरिता आंम्ही केंद्र सरकारकडे साखरेची किमान विक्री किंमत (एम.एस.पी.) प्रति किलोस रु. 50 करावी अशी मागणी केली आहे. तसेच दुष्काळामुळे उसाचे उत्पन्न (टनेज) घटणार असून, साखर उताराही कमी येणार असल्याने सरकारने गाळप होणाऱ्या उसास प्रति टन रु. 1 हजार अनुदान द्यावे, अशी मागणीही केली आहे. तर सरकारने राज्यातील साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन मंजूर केलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावाहिनी पवार  यांचे आभार व्यक्त केले.
   दुष्काळामुळे चालू गळीत हंगाम कमी कालावधीचा हंगाम असणार आहे, त्यामुळे 
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडसाठी गडबड करू नये. चालू हंगामामध्ये कारखाना ऊस दरामध्ये मागे राहणार नाही, तसेच वेळेवरती ऊस बिल अदा केले जाईल.  हार्वेस्टिंग प्रोग्रॅमप्रमाणे शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप केले जाणार असून, निरा भीमा कारखान्यास सर्व ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केले.
   यावेळी बॉयलर अग्नि प्रदीपन निमित्ताने सत्यनारायण पूजा संचालक सुभाष गायकवाड सर व उज्वला गायकवाड या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. तर गव्हाण पूजन व काटा पूजन  संचालक विजयराव घोगरे व लतिका घोगरे या उभयतांच्या हस्ते संपन्न झाले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. या कार्यक्रमास माजी अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अँड.कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे तसेच जयकुमार कारंडे, कांतीलाल झगडे, विकास पाटील, दत्तात्रय शिर्के, धनंजय कोरटकर, राजेंद्र कोरटकर, शरद जगदाळे, विक्रम कोरटकर, अजित खबाले, अमरदीप कळकुटे, राजेंद्र गायकवाड, लक्ष्मण आसबे, अँड.अनिल पाटील, सुरेश मेहेर, सुरेश जगदाळे, महावीर गांधी, दत्तात्रय अनपट, निवृत्ती शिंदे, मनोज मोरे, चंद्रकांत भोसले, अशोक शिंदे, हरिभाऊ घोगरे, दयानंद गायकवाड, रणजित गिरमे, माणिक खाडे, एच. के. चव्हाण, सतीश अनपट आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आवाड तर आभार उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.
_____________________________ फोटो:-शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा कारखान्याच्या गळीत हंगाम समारंभ प्रसंगी हर्षवर्धन पाटील, सौ.भाग्यश्री पाटील व मान्यवर.
close