shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथील कामगारांकरिता बँक ऑफ बडोदा तर्फे (पगारस्लीप खाते योजना) सॅलरी अकाउंट योजना अपघाती विमा 40 लाखावरून आता 80 लाख...

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथील कामगारांकरिता बँक ऑफ बडोदा तर्फे (पगारस्लीप खाते योजना) सॅलरी अकाउंट योजना अपघाती विमा 40 लाखावरून आता 80 लाख...

शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथील कायम व कंत्राटी कामगारांनी बँक ऑफ बडोदा शाखा शिर्डी येथे सॅलरी अकाउंट योजनेअंतर्गत जे खाती उघडलेले आहे त्यांच्या विम्यात विमा रकमेत बदल करण्यात आलेला असून पूर्वी अपघाती विमा रक्कम चाळीस लाख रुपये मिळत होती ती आता 80 लाख रुपये इतकी करण्यात आलेली असुन ज्या कामगारांना 50000 पेक्षा जास्त मासिक वेतन आहे अशा कामगारांना या योजनेअंतर्गत एक कोटी इतका अपघाती विमा तसेच नैसर्गिक मृत्यू झाल्यास पन्नास हजारापेक्षा कमी पगार असणाऱ्या कामगारांना दोन लाख रुपये व पन्नास हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्या कामगारांना पाच लाख रुपये इतके विमा कवच मिळणार आहे ऑन ड्युटी अपघाती मृत्यू झाल्यास विमाव्यतिरिक्त 25% अधिक ची रक्कम म्हणजेच जास्तीत जास्त 25 लाख रुपये अधिक क्लेम पास करण्यात येणार आहे तसेच मुलींच्या शिक्षणासाठी दहा टक्के अपघाती विमा कवच्या अधिक रक्कम जास्तीत जास्त दहा लाख रुपये इतकी व वरिष्ठ शिक्षणासाठी दहा टक्के म्हणजेच दहा लाख रुपये अतिरिक्त कवच मिळणार त्यासोबतच अपंगत्व आल्यास विम्याच्या 75 टक्के इतकी रक्कम मिळणार आहे ही रक्कम मिळविणे कामे बँक ऑफ बडोदाचे पगार बचत खाते ( सॅलरी अकाउंट खाते ) असणे गरजेचे असून या कामी बँक ऑफ बडोदा क्षेत्रीय संभाजीनगर कार्यालयाचे वरिष्ठ प्रबंधक श्री सागर आरगडे तसेच वरिष्ठ प्रबंधक श्री तुषार लांडे व बँक ऑफ बडोदा शिर्डी शाखा प्रबंधक श्री संदीप भागवत व श्री पवन जगताप व शिर्डी शाखेतील बँक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले असून ही योजना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथील कामगारांना लागू करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त कामगारांनी बँक ऑफ बडोदा शाखा शिर्डी शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून आपले सॅलरी अकाउंट योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही नम्र विनंती असे चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी शिर्डी म्हणाले.
close