shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणतांब्यातून घुमला वडार एकतेचा नारा; वीर वडार एकता फाउंडेशनच्या पहिल्या फलकाचे दिमाखदार अनावरण!

गावागावांत संघटन, घराघरांत स्वाभिमान; वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या पर्वाचा शुभारंभ!

अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला वेग; जिल्हा, तालुका, शहर व युवक कार्यकारिणींच्या माध्यमातून समाजएकजुटीचा निर्धार!

विजयदादा गोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांना केले संबोधित..

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह विशेष वृत्तसेवा | पुणतांबा, ता. राहाता

समाजाच्या प्रगतीसाठी केवळ घोषणा करून चालत नाही, तर त्या घोषणांना कृतीची जोड देणारे नेतृत्व आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे संघटन आवश्यक असते. याच विचारातून वडार समाजाचे संघटन, शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रतिष्ठा आणि सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन कार्यरत असलेल्या वीर वडार एकता फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील पहिल्या फलकाचे पुणतांबा येथे उत्साहपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले.


*श्रीरामपूर युवक तालुका कार्यकारणी
अध्यक्ष:- अमोल वसंत गुंजाळ 7620819759
संपर्क प्रमुख :- प्रतीक भगवान गुंजाळ 7666315600
कार्यध्यक्ष :- सतीश बाळासाहेब गायकवाड 7758072642
उप अध्यक्ष :- जितेश अनिल गायकवाड 
सचिव :- नितीन दत्तराय गायकवाड 
9579429515
कोषाध्यक्ष :- अक्षय दिलीप शिंदे 7038919203
मुख्य संघटक :- अविनाश कुसमाडे
8263065051
संघटक:- सागर शाम गायकवाड 
7744859691

विधानसभा अध्यक्ष :- किरण तान्हाजी मांजरे 8999870424

माहिती प्रसिद्धी प्रमुख :- 

*मीडिया प्रमुख :-
सह संपर्क प्रमुख :- अनिल गायकवाड 9970709536
जण संपर्क प्रमुख विजय एकनाथ गायकवाड 9359265062
ग्रामसंघटक प्रमुख :- सचिन विठ्ठल गुंजाळ 9668982328

अहिल्यानगर उत्तर जिल्हा युवक कार्यकारणी
उपाध्यक्ष :- अजय रामराव जाधव 
संघटक :-सागर अशोक गायकवाड 
उपकोषाध्यक्ष :- अजय राजेंद्र कुऱ्हाडे

एकच ध्येय – सक्षम बनू, समाज घडवू!

या ब्रीदवाक्याला अनुसरून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम वडार समाजाच्या संघटनात्मक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

वीर वडार एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा विठ्ठल गोरे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विखुरलेली शक्ती एकत्र आणून गाव, शहर, तालुका आणि जिल्हास्तरावर सक्षम संघटन उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुणतांबा येथे झालेल्या फलक अनावरणाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांतील समाजबांधव आणि पदाधिकारी एकत्र आले. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उंची!

या कार्यक्रमाला फाउंडेशनचे महासचिव ब्रह्मा धोत्रे, ज्येष्ठ पत्रकार तथा शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवेचे संपादक रमेश जेठे सर, ॲड.विनोद लष्कर, समन्वयक रमेश धोत्रे, शिर्डी मतदारसंघ संपर्कप्रमुख रामू धोत्रे, कार्यकारिणी सदस्य संदीप कुसळकर, जेष्ठ मार्गदर्शक दिपेशजी पिटेकर,समन्वयक नितीन शेलार, अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष मारुती विटेकर, भरत धोत्रे, विष्णू गुंजाळ, पप्पू कुसळकर, पूनम पवार, शंकर कुर्हाडे,सागर चौगुले ,संतोष कुर्हाडे,भास्कर शिंदे, अण्णा गायकवाड,आकाश धनवटे, रमेश कुऱ्हाडे, सचिन कुसळकर, अनिल बोठे व अहिल्या नगरजिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच पुणतांबा शहराध्यक्ष रामचंद्र पवार, कार्याध्यक्ष अरविंद धोत्रे, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.


अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला गती!

वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात संघटनात्मक विस्ताराला गती देण्यात येत असून जिल्हा, तालुका, शहर आणि युवक कार्यकारिणींच्या माध्यमातून नव्या नेतृत्वाला संधी दिली जात आहे.

अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष संपतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणी सुरू असून लोकसभा अध्यक्षपदी पोपट चंद्रभान पवार, उपाध्यक्षपदी आकाश रमेश धनवटे, मुख्य संघटकपदी भरत धोत्रे, संघटकपदी रमेश दशरथ कुऱ्हाडे, कायदेशीर सल्लागारपदी रोहित मारुती गायकवाड, सहसंपर्कप्रमुखपदी पांडुरंग (पप्पू) कुसळकर, जनसंपर्कप्रमुखपदी सोमनाथ जाधव यांच्यावर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

विष्णू मारुती गुंजाळ व भास्कर आप्पा शिंदे हे मार्गदर्शक म्हणून, तर गंगा गायकवाड समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

राहुरी तालुक्यात ज्येष्ठांसह युवकांचे नेतृत्व पुढे!

राहुरी तालुकाध्यक्षपदी विलास विश्वनाथ गुंजाळ, तालुका युवक कार्याध्यक्षपदी शांताराम रंगनाथ मांजरे, तर मीडिया प्रमुखपदी चंद्रभान तात्याबा गायकवाड यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

राहुरी शहराध्यक्षपदी राजेंद्र हिरामण गुंजाळ, संपर्कप्रमुख कैलास विश्वनाथ गुंजाळ, कार्याध्यक्ष अनिल सदाशिव गुंजाळ, उपाध्यक्ष संपत जगन्नाथ गुंजाळ, सचिव लक्ष्मण अण्णा गायकवाड, सहसचिव कैलास रामभाऊ गुंजाळ, कोषाध्यक्ष रवींद्र बाबुराव गुंजाळ, उपकोषाध्यक्ष शरद धोंडीराम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्य संघटक चंद्रकांत हनुमंता गुंजाळ, संघटक राजेंद्र भानुदास गुंजाळ, सल्लागार बाबासाहेब शंकर गुंजाळ, माहिती व प्रसिद्धीप्रमुख अनिल शंकर गुंजाळ, मीडिया प्रमुख सुरेश काशिनाथ गुंजाळ, जनसंपर्कप्रमुख श्रीकांत आसाराम गुंजाळ, ग्रामसंघटक सुनील रामलाल गुंजाळ, प्रवक्ते विष्णू रामू गुंजाळ आणि मार्गदर्शक प्रकाश मारुती गुंजाळ यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

राहुरी शहर युवक कार्यकारिणीत नव्या पिढीला संधी!

राहुरी शहर युवक अध्यक्षपदी अमोल भाऊसाहेब गुंजाळ, प्रमुख संपर्कपदी मनोज प्रकाश गुंजाळ, कार्याध्यक्षपदी कृष्णा अण्णा गुंजाळ, उपाध्यक्षपदी आदित्य विष्णू गुंजाळ, सचिवपदी महेश अर्जुन गुंजाळ, सहसचिवपदी आकाश चंद्रकांत गुंजाळ, कोषाध्यक्षपदी किरण भगवान गुंजाळ आणि उपकोषाध्यक्षपदी राहुल सोपान गुंजाळ यांचा समावेश आहे.

मुख्य संघटक अरुण वसंत गुंजाळ, संघटक विकास भानुदास गुंजाळ, सल्लागार प्रसाद भाऊसाहेब गुंजाळ, माहिती व प्रसिद्धीप्रमुख तुषार राजू गायकवाड, मीडिया प्रमुख नितीन अमर गुंजाळ, जनसंपर्कप्रमुख अतुल अण्णा पवार, ग्रामसंघटक रुपेश संपत गुंजाळ, प्रवक्ते पवन वसंत गुंजाळ आणि मार्गदर्शक विक्रम अशोक गायकवाड यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

राहाता तालुक्यात संघटनाचा विस्तार!

राहाता तालुकाध्यक्षपदी दीपक दत्तू कुऱ्हाडे, संपर्कप्रमुख सुनील प्रकाश कुऱ्हाडे, कार्याध्यक्ष संजय रामू जाधव, उपाध्यक्ष विकास राजू कुऱ्हाडे व अमोल यादव कुऱ्हाडे, सचिव राजू मारुती कुऱ्हाडे, सहसचिव सचिन मधुकर कुऱ्हाडे, कोषाध्यक्ष रवींद्र सुरेश कुसकर, उपकोषाध्यक्ष आकाश लगन पवार यांचा समावेश आहे.

मुख्य संघटक दीपक गोरख धनवटे, संघटक सुनील पवार, सल्लागार दिलीप गायकवाड व रमेश जगन्नाथ धनवटे, मीडिया प्रमुख अरुण दीपक पवार, सहसंपर्कप्रमुख अतुल भगवान कुसळकर, जनसंपर्कप्रमुख कैलास रमेश गायकवाड, ग्रामसंघटक सतीश अशोक गुंजाळ आणि मार्गदर्शक वसंत सटवा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राहाता शहरातही सक्षम कार्यकारिणी!

राहाता शहराध्यक्षपदी स्वप्निल सोमनाथ कुऱ्हाडे, कार्याध्यक्ष महेश विलास कुऱ्हाडे, संपर्कप्रमुख साई चंद्रभान जाधव, उपाध्यक्ष प्रसाद लक्ष्मण कुऱ्हाडे व नितीन सुनील शिंदे, सचिव दत्तू अर्जुन शिंदे, सहसचिव विशाल निवृत्ती कापसे, कोषाध्यक्ष अविनाश रावसाहेब कुऱ्हाडे, उपकोषाध्यक्ष आकाश सुभाष कुऱ्हाडे यांचा समावेश आहे.

मुख्य संघटक किसन रमेश कुऱ्हाडे, संघटक अजय मनोज कुऱ्हाडे, सल्लागार दत्तू रामदास कुऱ्हाडे, माहिती व प्रसिद्धीप्रमुख ऋषिकेश संतोष शिंदे, मीडिया प्रमुख योगेश संजू कुऱ्हाडे, जनसंपर्कप्रमुख विनायक ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, ग्रामसंघटक विनय रामदास कुऱ्हाडे, प्रवक्ता स्वप्निल (योगेश संजू कुऱ्हाडे) आणि मार्गदर्शक संदीप बाबासाहेब गुंजाळ यांचाही कार्यकारिणीत समावेश आहे.

राहाता शहर युवक अध्यक्षपदी कृष्णा रमेश कुऱ्हाडे, कार्याध्यक्ष दीपक भाऊसाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष किरण विठ्ठल गुंजाळ, सचिव सचिन विठ्ठल कुसाळकर, संघटक विघ्नेश संतोष शिंदे आणि मीडिया प्रमुख आकाश अर्जुन गायकवाड यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

देवळाली प्रवरा, पुणतांबा आणि श्रीरामपूरमध्येही संघटनाची पावले!

देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी अनिल बाळू इर्ले, शहर संपर्कप्रमुख गणेश रमेश गायकवाड, कार्याध्यक्ष गणेश राजू गर्दे, उपाध्यक्ष वैभव सुनील गायकवाड, मीडिया संपर्कप्रमुख अविनाश नवनाथ इर्ले, कोषाध्यक्ष ऋत्विक दिलीप धोत्रे, संघटक दादासाहेब डुकरे आणि सचिव रवींद्र वसंत गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.

पुणतांबा शहराध्यक्षपदी रामचंद्र विठ्ठल पवार, उपाध्यक्षपदी दिलीप रामदास गायकवाड आणि कार्याध्यक्षपदी अरविंद संजय धोत्रे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

श्रीरामपूर तालुका विधानसभा अध्यक्षपदी गोरख अण्णा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केवळ फलक नव्हे, समाजपरिवर्तनाचा संकल्प!

पुणतांब्यात अनावरण करण्यात आलेला फलक हा केवळ संघटनेच्या नावाचा फलक न राहता वडार समाजाच्या एकजुटीचे, अस्मितेचे आणि नव्या सामाजिक पर्वाचे प्रतीक ठरावा, अशी भावना या उपक्रमामागे आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, युवकांना रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण, शासनाच्या विविध योजनांची माहिती, सामाजिक प्रश्नांवर कायदेशीर मार्गदर्शन आणि समाजाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या उद्दिष्टांना संघटनात्मक कार्यातून प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

संघटनेची खरी ताकद पदाधिकाऱ्यांच्या संख्येत नसून समाजासाठी केलेल्या कार्यात असते. प्रत्येक पदाधिकारी समाजाच्या प्रश्नांसाठी तत्पर राहिला, प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी राहिली आणि प्रत्येक कुटुंबाला संघटनेचा आधार मिळाला, तर सामाजिक परिवर्तनाची ही चळवळ अधिक व्यापक होऊ शकते.

पुणतांब्यातील पहिल्या फलक अनावरणाने वीर वडार एकता फाउंडेशनच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळाली असून संस्थापक अध्यक्ष विजयदादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत संघटनेची बांधणी करण्याचा निर्धार अधिक बळकट होत आहे.

एकतेचा संदेश...

पदासाठी नव्हे, समाजासाठी उभे राहू,
मतभेद विसरून एकतेचे दीप लावू!
शिक्षण, संघटन, स्वाभिमानाचा जागर करू,
वीर वडार एकतेतून सक्षम समाज घडवू!

जय बजरंग! जय वडार!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह
सत्य, निर्भीड व जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारी वृत्तसेवा.


close