shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान,भामानगर येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

हजारो भाविकांनी घेतले अडबंगनाथ महाराजांचे दर्शन; कीर्तन, महाप्रसाद आणि दूध अमृताचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न..

भामानगर ता.श्रीरामपूर प्रतिनिधी:
गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर (भामाठाण), ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथील पवित्र तपोभूमीत रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोजागिरी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

प्रभू श्रीरामचंद्रांच्या अश्रूंनी निर्माण झालेली पवित्र शिळा आणि त्या शिळेवर अडबंगनाथ महाराजांनी बारा वर्षे केलेली तपश्चर्या, अशा पावन तपोभूमीचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दिवसभर हजारो भाविकांनी अडबंगनाथ महाराजांचे दर्शन घेतले.

उत्सवानिमित्त दुपारी ४ ते ६ या वेळेत ह.भ.प. बाळकृष्ण महाराज पारखे, कुरणपूर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. संतपूजन श्री. शामराव देठे पाटील यांच्या वतीने करण्यात आले. श्री. बाबासाहेब गणपतराव टेमकर साहेब, मेंढी, भालगांव, ता.गंगापूर यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रात्री १२ वाजता भाविकांच्या उपस्थितीत दूध अमृताचा कार्यक्रम पार पडला. गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या समवेत सत्संग,भजन आणि भक्तिरसाचा आनंद घेत भाविकांनी या उत्सवाचा अनुभव घेतला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

या कार्यक्रमास सर्जेराव कोते पाटील -शिर्डी, पोलीस उपनिरीक्षक सतीश डवले साहेब, गावडे दादा, मुंबई व त्यांचा मित्रपरिवार, शामराव देठे पाटील, सतीश शेळके,भोकर, भाऊसाहेब काळे पत्रकार, बाळासाहेब हुरुळे, देविदास महाराज जगताप,आप्पा महाराज जगताप, कैलास महाराज दुशिंग, अशोक मुठे, बाबासाहेब तात्या असणे, निळकंठ तरकसे बाबूजी, सुनीताताई चंदणे, पुणे, अल्ताफ भाई पठाण, निर्मळ साहेब बाभळेश्वर, दिपाली फरगडे सरपंच भैरवनाथ नगर श्रीरामपूर, यांच्यासह विविध क्षेत्रांतील अधिकारी, पदाधिकारी, मान्यवर, महाराज मंडळी आणि गायनाचार्य उपस्थित होते.

भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कोजागिरी पौर्णिमा उत्सव अत्यंत आनंदात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

*वृत्त विशेष सहयोग
सर्जेराव अ.कोते पाटील शिर्डी 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
000

close