shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. अनिल शिर्के यांना सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; आयएमए इंदापूर शाखेचा गौरवइंदापूर शाखेतील उत्कृष्ट अध्यक्षपदाच्या कार्याची दखल; १४ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे पुरस्कार वितरण

डॉ. अनिल शिर्के यांना सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; आयएमए इंदापूर शाखेचा गौरव

इंदापूर शाखेतील उत्कृष्ट अध्यक्षपदाच्या कार्याची दखल; १४ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे पुरस्कार वितरण
इंदापूर : प्रतिनिधी

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या ‘प्रेसिडेंट्स अप्रिसिएशन अवॉर्ड फॉर बेस्ट प्रेसिडेंट – स्मॉल ब्रँच’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आयएमए इंदापूर शाखेची निवड करण्यात आली आहे. शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के यांच्या अध्यक्षपदाच्या कार्याची तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, डॉ. अनिल शिर्के यांना सन २०२४-२५ या वर्षातही याच स्वरूपाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता सन २०२५-२६ या वर्षासाठी पुन्हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरावर गौरविण्यात येणार आहे. हा इंदापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे पुरस्काराची माहिती दिली आहे.

या पुरस्काराचे वितरण १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथील उत्तर अंबाझरी रोडवरील आयएमए हाऊसशेजारी असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स हॉलमध्ये आयोजित MASTACON 2026 या महाराष्ट्र राज्याच्या परिषदेत करण्यात येणार आहे. आयएमए महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी MASTACON 2026 परिषदेसाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे अधिकृत पत्रात नमूद करण्यात आले आहे.

डॉ. शिर्के यांच्या अध्यक्षपदाच्या कार्याची सलग दोन वर्षे राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने आयएमए इंदापूर शाखेच्या कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पुरस्कारामुळे इंदापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा राज्यस्तरावर गौरव होणार असून, वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांकडूनही या यशाचे स्वागत करण्यात आले 
close