आदर्श शिक्षिका भारती ओंबासे यांचा डॉ. अतुल वनवे व डॉ. प्रतिभा वनवे यांच्या हस्ते सन्मान
इंदापूर : महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित आणि ‘महाराष्ट्र राज्य आयडॉल टीचर’ म्हणून निवड झालेल्या सौ. भारती आकाराम ओंबासे (वनवे) यांचा प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अतुल वनवे आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिभा वनवे यांच्या हस्ते सन्मान करून अभिनंदन करण्यात आले.
जिल्हा परिषद सातारा, तालुका माण येथील वाघमोडे वस्ती शाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारती ओंबासे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या समर्पणामुळे शाळेने विशेष ओळख निर्माण केली असून, त्यांच्या यशाबद्दल वनवे कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी डॉ. अतुल वनवे यांनी बहीण भारती यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. त्यांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत, भारती ओंबासे आणि त्यांचे पती आदर्श शिक्षक श्री. आकाराम ओंबासे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या भारती ओंबासे यांचा हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव ठरला. आदर्श शिक्षिका भारती ओंबासे या प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अतुल वणवे यांच्या बहिणी आहेत

