shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहा मीटर एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत यशराज जवळकरची सुवर्णभरारी!३० स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावत लाखेवाडीच्या विद्यानिकेतन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला

दहा मीटर एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत यशराज जवळकरची सुवर्णभरारी!

३० स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावत लाखेवाडीच्या विद्यानिकेतन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला
लाखेवाडी : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित आंतरविभागीय दहा मीटर एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत लाखेवाडी येथील विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी यशराज रघुनाथ जवळकर याने प्रथम क्रमांक पटकावत दैदीप्यमान यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे लाखेवाडी परिसरासह महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, कर्मवीर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे-पंढरपूर आणि आर्यमान शूटिंग क्लब, पिलीव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्मवीर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे-पंढरपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत जय भवानी विकासगड प्रतिष्ठान, लाखेवाडी (ता. इंदापूर) संचलित विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी यशराज रघुनाथ जवळकर याने आपल्या अचूक नेमबाजीचे कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि प्रथम क्रमांक मिळविला.

यशराजने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा डॉ. सौ. चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, सहसचिव ऋषिकेश ढोले, विश्वस्त पृथ्वीराज ढोले यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष जोशी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशराजचे कौतुक करून त्याला पुढील क्रीडा व शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास ते आपल्या कौशल्याच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठू शकतात, याचे यशराज जवळकर याने मिळविलेले यश हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
close