shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमृत दुर्गोत्सव २०२६ निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहाळी येथे किल्ले बनवा स्पर्धा.

अमृत दुर्गोत्सव २०२६ निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहाळी येथे किल्ले बनवा स्पर्धा.
  इंदापूर प्रतिनिधी : अमृत दुर्गोत्सव २०२६ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व्याहाळी येथे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासप्रेम, दुर्गसंवर्धनाची जाणीव व छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने किल्ला बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.
       या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सिंहगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, रायगड आदी ऐतिहासिक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्ल्यांमध्ये महाराजांचे सिंहासन, भक्कम तटबंदी, दरवाजे, बुरूज, पाण्याच्या टाक्या, पानवठे, शेती व्यवस्था तसेच घोडे, हत्ती आणि सैनिकांच्या प्रतिकृतींचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.
          किल्ल्यांच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे संदेशही देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, कलागुणांचे आणि इतिहासावरील प्रेमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.     शाळेच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचे महत्त्व समजले तसेच "किल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे" हा संदेश प्रभावीपणे रुजवण्यात यश आले. यावेळी केंद्रप्रमुख भारत शेंडे , मुख्याध्यापक प्रभाकर लावंड ,  शिक्षक तात्याराम धायतोंडे , खुशाली धायतोंडे , कैलास गावडे , संतोष हेगडे यांचे सह पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
close