shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध

हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध 
इंदापूर: प्रतिनिधी दि.4/11/26
                                  महात्मा फुलेनगर- बिजवडी (ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची सन 2021-2031 ची पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 4) बिनविरोध पार पडली.
   या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बुधवार ( दि. 4 ) या आजच्या शेवटच्या दिवशी 21 जागांसाठी 21 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.यशवंत माने यांनी केली. कारखान्याच्या बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये  हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील आदी मान्यवर उमेदवारांचा समावेश आहे.
बिनविरोध निवड झालेले 21 उमेदवार पुढीलप्रमाणे:- पाटील हर्षवर्धन शहाजीराव, पाटील राजवर्धन हर्षवर्धन, शुक्ला राकेश रमेशप्रसाद, सरडे रविंद्र वामन, शिदे शांतीलाल दत्तात्राय, भोगळे छगन धोडीबा, देवकर निलेश शामराव, देवकर राजेद्रकुमार प्रतापराव, काळे संतोष लक्ष्मण, देवकर श्रीकांत खिंवराव, खर्चे विजय विठ्ठल, जाधव पराग रमेशराव, निकम रणजित नामदेव, गायकवाड रोहित राजेद्र, नलवडे बिभिषण कल्याण, शिगाडे अतुल शिवाजी, मोहोळकर वसंत खंडू, पारेकर हरिश्चंद्र सदाशिव, पवार रत्नमाला संपत, व्यवहारे सुमन नारायण, जाधव अमोल सुभाष. सदर निवडणूक बिनविरोध पार पाडणेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खा.सुप्रिया सुळे, खा.पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच प्रदीप गारटकर, प्रवीण माने आदी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांचे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार्य लाभलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले.
_________________________
फोटो:-हर्षवर्धन पाटील.
close