shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी प.पू. महंत मल्ले बाबा, तर सचिवपदी अमोल कोल्हेकर; महानुभाव परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर

​वडाळा महादेव  (प्रतिनिधी):
येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर (मोठा आश्रम) येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली असून, जिल्हाध्यक्षपदी प.पू. महंत मल्ले बाबा तर जिल्हा सचिवपदी अमोल दादा कोल्हेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ​सदर बैठक महानुभाव पंथाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महंत रामचंद्र बाबाजी गुर्जर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पंथाच्या वाढीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पूर्ण करून खालीलप्रमाणे घोषणा करण्यात आली. ​
जिल्हा कार्यकारिणी 
​जिल्हाध्यक्ष: प.पू. महंत मल्ले बाबा ​जिल्हा सचिव अमोल दादा कोल्हेकर ​कार्याध्यक्ष विजय परांडेकर बाबा, महंत घुग्गे बाबा, महंत येल्हेराज बाबा धाराशिवकर 
याच बैठकीत श्रीरामपूर आश्रमाचे दत्तराज बाबा  मोठा आश्रम यांची 'अखिल भारतीय महानुभाव परिषद' केंद्रीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, उपस्थित सर्व महंतांच्या आणि भाविकांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

​या प्रसंगी महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष महंत कृष्णराज बाबा लाड यांच्यासह जिल्ह्यातील विविध आश्रमांचे महंत, साधक आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी महंत श्री दत्तराज बाबा  म म श्री निमगावकर बाबा  म श्री  गोमेराज बाबा विंद्वास  म श्री रामचंद्र बाबा गुर्जर दीपक मामा गुर्जर सुदाम दादा विद्वांस सचिन दादा यामनिकर मुरलीधर दादा दर्यापुरकर  दादराव बाबा राजेन्द्र आढाव मयंकराज बाबा अंकुळनेरकर मं पुसदकर बाबा  महंत चक्रपाणी बाबा सुर्यभाण बोठे सर पांडु वडीतके बाबा खर्डे नंदु पा चोरमळ  आदी यावेळी उपस्थित होते आभार सचिन लाड बाबा यांनी मानले -
close