*भिमाई आश्रमशाळेत लोकशाहीचा उत्सव साजरा होणार.*
(*विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक : २०२६-२७ जाहीर*)
*इंदापूर, दि. १४ जुलै २०२६* : येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंकित असणाऱ्या 
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, इंदापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी संयुक्त विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक, नेतृत्वगुणांचा विकास आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे मतपत्रिकेवर राबविण्यात येणार आहे.
आश्रमशाळा मुख्य निवडणूक अधिकारी एच. एन. चंदनशिवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे पार पडणार आहे.
दि. १४ जुलै २०२६ – विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीची अधिकृत घोषणा.
दि. २० जुलै २०२६ – उमेदवारी अर्ज भरणे.
दि. २२ जुलै २०२६ – उमेदवारी अर्जांची छाननी व पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप.
दि. २० ते २८ जुलै २०२६ (सायं. ५.०० वाजेपर्यंत) – प्रचार कालावधी.
दि. २९ जुलै २०२६ – मतदान प्रक्रिया.
दि. ३० जुलै २०२६ – मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे 
यावेळी आश्रमशाळेचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एच.एन.चंदनशिवे सर यांनी वृत्तपत्र प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, "लोकशाही मूल्ये जपूया, जबाबदार नेतृत्व निवडूया, आपला मतदानाचा हक्क बजावूया" असा संदेश देण्यात आला आहे. ही निवडणूक विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीची प्रत्यक्ष अनुभूती देणारी आणि नेतृत्वगुण विकसित करणारी ठरणार असल्याचा विश्वास संस्थेच्या वतीने सचिव ॲड.समीर मखरे तसेच आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापक साहेबराव पवार सर, प्राचार्या समता मखरे मॅडम यांनी व्यक्त केला आहे.