जगदगुरू संत तुकाराम महाराज समाजरत्न पुरस्काराने अनिताताई खरात सन्मानित
आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात गौरव
हा पुरस्कार मिळणे, हे माझे मोठे भाग्य - अनिताताई खरात
इंदापूर : आषाढी एकादशी आणि राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २०२६ मध्ये सौ. अनिताताई नानासाहेब खरात यांना 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज समाजरत्न पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शुक्रवार (दि. २५ जुलै) रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
यावेळी अनिताताई खरात यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनिता खरात म्हणाल्या,कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे समाजकार्य करत राहिल्यास त्याचे यश निश्चित मिळते. आषाढी एकादशीसारख्या पवित्र दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणे, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. त्या पुढे म्हणाल्या की गेल्या दोन महिन्यांत मला मिळालेला हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार असून पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतून मला सन्मान मिळाला आहे. शेतकरी, महिला, अनाथ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मी यापुढेही प्रामाणिकपणे कार्य करत राहीन अशी ग्वाही या पुरस्काराच्या निमित्ताने देते.
या कार्यक्रमास साहित्य, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

