shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरनिमगावच्या अनंतराव पवार विद्यालयाचा पूर्व माध्यमिक इयत्ता सातवी परीक्षेमध्ये 100% निकाल.

निरनिमगावच्या अनंतराव पवार विद्यालयाचा पूर्व माध्यमिक इयत्ता सातवी परीक्षेमध्ये 100% निकाल. 
इंदापूर: निर- निमगाव (ता - इंदापूर) कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित अनंतराव पवार विद्यालय नीर- निमगाव येथील अनंतराव पवार विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला असून 
फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी या परीक्षेत कै.अनंतराव पवार ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित ,अनंतराव पवार विद्यालय निरनिमगाव या विद्यालयातील नऊपैकी नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाले आहेत. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब मोरे यांनी दिली.
शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे 
 अथर्व दादा शेंडगे 238 गुण, अमृता कल्याण घोगरे 236 गुण, नंदिनी निलेश गरगडे 236 गुण ,सिद्धी जयवंत आगलावे 232 गुण,श्रेया प्रशांत बुरुंगले 230 गुण , सानिका संतोष मुळीक 226 गुण, सोहम तानाजी लाळगे 216 गुण ,शिवम संदीप गरगडे 194 गुण,श्रवण जिनेश काटकर 194 गुण
वरील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभागप्रमुख श्रीम. घोगरे ए .डी, श्री. मोरे बी .एम .श्री. गोरे ए .पी.,श्री. मोरे ए .व्ही. तसेच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री बाळासाहेब गरगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.दत्ताजीराव घोगरे ,उपाध्यक्ष श्री .रणजीत घोगरे, सचिव श्री .अजित घोगरे व संचालक मंडळ यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
close