संत सोपान काका स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा तालुक्यात प्रथम क्रमांक.
इंदापूर - बावडा: श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाने इंदापूर तालुक्यामध्ये संत सोपान काका स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह (ट्रॉफी ),प्रशास्तीपत्रक, व 5000 रु चेक सदर कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी आचार्य अत्रे सभागृहामध्ये गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी संपन्न झाला या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आ. संजय जगताप, आ. निरंजन डावखरे, पुणे जिल्हा शिक्षण परिषद विभागातील उच्च पदस्थ अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
हा पुरस्कार प्राचार्य डी आर घोगरे व स्टाफ यांनी स्वीकारला. संत सोपान काका स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील संस्थेचे सचिव व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील ,संस्थेचे उपाध्यक्ष मनोजराव पाटील, संस्थेचे संचालक किरणराव पाटील संस्थेचे संचालक तथा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व सर्व संचालक मंडळांने अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावरील परीक्षण समिती ने विद्यालयाची तपासणी केली होती विद्यालयाचा शालेय परिसर स्वच्छता व शालेय रेकॉर्डची तपासणी या समितीच्या वतीने करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य घोगरे डीआर, उपप्राचार्य हासे डी व्ही, पर्यवेक्षक व्यवहारे एस आर व लोहकरे अर बी ,परीक्षा विभाग प्रमुख पाटील डी ए ,सांस्कृतिक विभाग प्रमुख मुलानी एस टी, सातपुते डी एल , यादव एस आर , शेख आर जे , फडतरे एच एल रांगोळी विभागाचे प्रमुख सौ भोसले डी यू, शालेय पोषण आहार विभागचे झगडे एल सी व पोतदार जी पी ,शालेय रेकॉर्ड विभागाचे प्रमुख क्लार्क कोळी डी एस व त्यांचे सहकारी* यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी या सर्वांनी या स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी बहुमोल सहकार्य केले. यामुळेच विद्यालयाने कला क्रीडा सांस्कृतिक आणि गुणवत्ता या क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. या स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे विद्यालयाचे सर्व स्तरातून तसेच पालक वर्गातून विशेष अभिनंदन केले जात आहे.
------------------
फोटो ओळ: श्री शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाने इंदापूर तालुक्यामध्ये संत सोपान काका स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याचा पुरस्कार देताना मान्यवर.

