इंदापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती (गलांडवाडी नं 2)येथे आज सोमवार दि.१५/६/२०२६ रोजी इ.१लीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण, गुलाबपुष्प,फुगे व खाऊ देऊन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे व गणवेशाचे वाटप माजी सरपंच गोपीचंद गलांडे, अध्यक्ष गणेश कदम, अभिजित साळुंके, स्वप्नाली कदम, स्वाती देवकर, दीपाली देवकर,सोनाली कदम, व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,पालक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माजी सरपंच गोपीचंद गलांडे यांनी सर्व मुलांना वही आणि पेन वाटप केले तसेच शाळांपोयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले
मुख्याध्यापक वसंत फलफले प्रास्ताविक केले तर उपशिक्षक संजय पिंपरे यांनी आभार मानले

