shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक २ पोटनिवडणुकीत भाजपचा प्रचार शुभारंभ आज भव्य स्वरूपात


मा. आ. बाबासाहेब कुणालजी पाटील व जिल्हाध्यक्ष बापुसाहेब रामकृष्णजी खलाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रचाराचा शुभारंभ सोहळा

सामोडे प्रतिनिधी : ( दिलीप घरटे )
पिंपळनेर नगरपरिषद पोटनिवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक २ मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सोहळा सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा प्रचार शुभारंभ सोहळा हनुमान मंदिर, पाण्याच्या टाकीजवळ, इंदिरानगर, पिंपळनेर येथे संपन्न होणार असून, या कार्यक्रमास मा. आ. बाबासाहेब कुणालजी पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. बापुसाहेब रामकृष्णजी खलाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पार्टीतर्फे श्री. संजय सखाराम ठाकरे व सौ. तैमून नौशाद सैय्यद हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सोहळ्यास भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच प्रभागातील मतदार बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, पिंपळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक २ मधील ही पोटनिवडणूक महत्त्वाची मानली जात असून, भाजपकडून संघटनात्मक ताकद दाखवत प्रचाराचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे.
close