shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१९ अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या..!पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा धडाकेबाज निर्णय; प्रशासनात शिस्त व कार्यक्षमतेवर भर

अहिल्यानगर | प्रतिनिधी
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस प्रशासनात कार्यक्षमता, शिस्त आणि गतिमानता आणण्याच्या उद्देशाने १९ पोलीस अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे जिल्हा पोलीस दलात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन 

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची यादी...
जगदीश भांबळ : तोफखाना पोलीस ठाणे येथून नियंत्रण कक्षात बदली.
विलास पुजारी : पाथर्डी पोलीस ठाण्यातून मानव संसाधन विभागात नियुक्ती.
रवींद्र देशमुख : नियंत्रण कक्षातून राहुरी पोलीस ठाण्यात बदली.
संभाजी गायकवाड : कोतवाली पोलीस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात नियुक्ती.
संजय ठेंगे : राहुरी येथून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बदली.
किरण शिंदे : श्रीगोंदा येथून मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU) मध्ये नियुक्ती.
नितीन देशमुख : श्रीरामपूर येथून कोतवाली पोलीस ठाण्यात बदली.
आनंद कोकरे : मानव संसाधन विभागातून पाथर्डी पोलीस ठाण्यात नियुक्ती.
प्रताप दराडे : नियंत्रण कक्षातून नेवासा पोलीस ठाण्यात बदली.
बाबासाहेब बोरसे : शहर वाहतूक शाखेतून घारगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती.
महेश पाटील : नियंत्रण कक्षातून शहर वाहतूक शाखेत बदली.
दीपक सरोदे : नियंत्रण कक्षातून राहाता पोलीस ठाण्यात नियुक्ती.
बालाजी वैद्य : मानव तस्करी प्रतिबंधक कक्षातून (AHTU) तोफखाना पोलीस ठाण्यात बदली.
हनुमान गायकवाड : नियंत्रण कक्षातून कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती.
हेमंत थोरात : घारगाव पोलीस ठाण्यातून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली.
युवराज आठरे (सहायक पोलीस निरीक्षक) : आर्थिक गुन्हे शाखेतून लोणी पोलीस ठाण्यात नियुक्ती.
माणिक चौधरी : एमआयडीसी पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत बदली.
जगदीश मुलगीर : भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती.
तेजस्विनी थोरात (सहायक पोलीस निरीक्षक) : कोतवाली पोलीस ठाण्यातून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बदली.
नव्या कार्यपद्धतीची सुरुवात
मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी कारवाया, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे आणि वाहतूक व्यवस्थापन यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे.
या बदल्यांमुळे विविध पोलीस ठाण्यांना अनुभवी अधिकारी मिळणार असून जनतेच्या तक्रारींचे जलद निवारण, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि पोलीस यंत्रणेतील उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, आगामी काळात आणखी काही प्रशासकीय बदल होण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून व्यक्त केली जात असून जिल्हा पोलीस दलात नव्या कार्यसंस्कृतीची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
close