shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने अनिताताई खरात सन्मानित .पुणे येथील राष्ट्रभक्त परिवार, प्रहार युथ ऑर्गनायझेशन यांनी केले सन्मानित.

 पुणे येथे राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने अनिताताई खरात सन्मानित .

पुणे येथील राष्ट्रभक्त परिवार, प्रहार युथ ऑर्गनायझेशन यांनी केले सन्मानित.
इंदापूर : पुणे येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ अनिताताई नानासाहेब खरात यांना(दि.७जुन ) रोजी राष्ट्रभक्त परिवार, प्रहार युथ ऑर्गनायझेशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सौ भारती  तुपे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रभक्ती महिला संघटना सहाय्यक पोलीस निरीक्षक रतिलाल चौधरी साहेब, सुनीलजी गोरे साहेब अध्यक्ष राष्ट्रभक्त परिवार तसेच राजेंद्र पवार साहेब अध्यक्ष अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पुणे येथे पार पडला. 
या पुरस्काराला उत्तर देताना अनिताताई खरात म्हणाल्या की सामाजिक काम करत असताना अनेक संकटे येत असतात अनेक प्रकारच्या टीका टिपणी होत असतात कोणी बरोबर कोणी चूक म्हणत असतं नाहक आरोपांना सामोरे जावे लागते आपण आपले काम प्रमाणिकपणे करत असतो परंतु काही विघ्नसंतूष्टी लोक आपणाला त्रास होण्यासाठी काहीही बिनबुडाचे आरोप करत असतात काहींना काम न करता फक्त प्रसिद्धी व कामाचे श्रेय घेण्यासाठी आपल्या अरेरावीच्या जोरावर कोणाला तरी पुढे करून सामाजिक कार्यकर्त्यांना जे खरंच काम करतात त्यांना त्रास देतात, त्यांना सामाजिक कामापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करतात कारण अशा लोकांना कमी कामात जास्त प्रसिद्ध आणि जास्त वा, वा पाहिजे असते परंतु आपण या अशा लोकांकडे लक्ष न देता आपले काम प्रमाणिकपणे करत राहणे हेच अतिशय उत्तम ठरते आणि तेव्हाच आपण सामाजिक काम करू,आज मला राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याबद्दल मी मान्यवरांचे मनापासून आभार मानते व मी आपणास ग्वाही देते की मी याच्या अगोदरही सामाजिक काम प्रमाणिकपणे करत आले आहे आणि इथून पुढे तर कायमस्वरूपी आपल्या पुरस्काराला शोभेल असे सामाजिक काम कायमस्वरूपी करत राहील.शेतकरी विद्यार्थी माझ्या महिलाभगिणी, अनाथ, वृद्ध या सर्वांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी तत्पर राहील मी पुन्हा एकदा मला आपण पुरस्कार दिल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार मानते.
close