सोनई प्रतिनिधी):मोहन शेगर
येथील एका नागरिकाने घेतलेल्या १ लाख रुपयांच्या कर्जापोटी संबंधित पतसंस्थेने तब्बल ३६ लाख रुपयांची अवाजवी मागणी केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर पैसे न भरल्यास घर जप्त करण्याची नोटीस दिल्याने, हतबल झालेल्या पीडित कुटुंबाने आता न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' तक्रार निवारण पोर्टलवर रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनई येथील रहिवासी सुनीता संदीप वैरागर यांच्या पतीने सोनई मधील व्यापारी सहकारी पतसंस्थेकडून' २३ नोव्हेंबर २०२३ रोजी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, माझे पती हे ड्रिंक करत असल्याने सदर कर्ज दहा लाख रुपये दाखवले त्या पोटी 36 लाख रुपये दाखवून पतसंस्थेने त्यांना नोटीस पाठवून थेट घर जप्त करण्याची धमकी दिली आहे. तसेच मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा अत्यंत अवाजवी अशा ३६ लाख रुपयांच्या मागणीचा तगादा लावला आहे..
कुटुंबाची हतबलता आणि इशारा:
"आम्ही हातावर पोट असणारे सर्वसामान्य लोक आहोत, एवढी मोठी रक्कम आम्ही कुठून आणि कशी भरणार? आम्ही इतक्या मोठ्या रकमेचे कर्ज कधीही घेतलेले नाही," अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडित महिलेने दिली आहे. तसेच, या प्रकरणी योग्य चौकशी होऊन न्याय न मिळाल्यास, आपल्या कुटुंबाकडे सामूहिक आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
या गंभीर प्रकरणी आता सहकार विभाग आणि वरिष्ठ प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले):
येथील एका नागरिकाने घेतलेल्या १ लाख रुपयांच्या कर्जापोटी संबंधित पतसंस्थेने तब्बल ३६ लाख रुपयांची अवाजवी मागणी केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर पैसे न भरल्यास घर जप्त करण्याची धमकी दिल्याने, हतबल झालेल्या पीडित कुटुंबाने आता न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' तक्रार निवारण पोर्टलवर रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनई येथील रहिवासी सुनीता संदीप वैरागड यांनी 'शहरी सहकारी पतसंस्था' (सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथून २३ नोव्हेंबर २०२३ रोजी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आज रोजी सदर पतसंस्थेने त्यांना नोटीस पाठवून थेट घर जप्त करण्याची धमकी दिली आहे. तसेच मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा अत्यंत अवाजवी अशा ३६ लाख रुपयांच्या मागणीचा तगादा लावला आहे.
कुटुंबाची हतबलता आणि इशारा:
"आम्ही हातावर पोट असणारे सर्वसामान्य लोक आहोत, एवढी मोठी रक्कम आम्ही कुठून आणि कशी भरणार? आम्ही इतक्या मोठ्या रकमेचे कर्ज कधीही घेतलेले नाही," अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडित महिलेने दिली आहे. तसेच, या प्रकरणी योग्य चौकशी होऊन न्याय न मिळाल्यास, आपल्या कुटुंबाकडे सामूहिक आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
या गंभीर प्रकरणी आता सहकार विभाग आणि वरिष्ठ प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

