shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेत यश; श्रद्धा मोहिनी नयन पाटील यांचे सर्वत्र कौतुक



कै. नामदेव भदु पाटील, कै. लताबाई नामदेव पाटील, कै. पांडुरंग दगडू पगारे व गं. भा. कमलाबाई पांडुरंग पगारे यांची नात CA पदवीने सन्मानित

नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर CA श्रद्धा मोहिनी नयन पाटील यांनी चार्टर्ड अकाउंटन्सी ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि कठीण समजली जाणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून CA पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
CA श्रद्धा मोहिनी नयन पाटील या कै. नामदेव भदु पाटील, कै. लताबाई नामदेव पाटील, कै. पांडुरंग दगडू पगारे व गं. भा. कमलाबाई पांडुरंग पगारे यांची नात असून, त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मिळवलेले हे यश संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानास्पद ठरले आहे. पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षा उत्तीर्ण करणे ही अत्यंत मोठी कामगिरी मानली जाते. या यशामागे त्यांची अभ्यासातील निष्ठा, नियोजनबद्ध तयारी, आत्मविश्वास आणि कुटुंबीयांचे मोलाचे पाठबळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्र हे देशातील अत्यंत प्रतिष्ठित व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक असून, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कठोर अभ्यास, संयम आणि सातत्याची गरज असते. अशा परिस्थितीत CA श्रद्धा मोहिनी नयन पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून तरुण पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

त्यांच्या या यशामुळे कुटुंबाचा मान उंचावला असून, समाजातील विद्यार्थ्यांसाठीही हा प्रेरणादायी क्षण ठरला आहे. “ध्येय निश्चित असेल, मेहनत प्रामाणिक असेल आणि प्रयत्न सातत्यपूर्ण असतील तर यश निश्चित मिळते,” हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे.

या गौरवशाली यशाबद्दल CA श्रद्धा मोहिनी नयन पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
close