आदर्श शिक्षक पुरस्काराने श्री हनुमान विद्यालय अवसरीचे शिक्षक नानासाहेब गळके यांना सन्मानित.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील श्री हनुमान विद्यालय अवसरी येथील गणित विषयाचे तज्ञशिक्षक नानासाहेब घळके सर यांना यावर्षीचा बी द चेंज फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सुमित रेवरी, रुक्मिणी गलांडे,अभिनेत्री निविदिता पगार, अमृत रोहिणी, बी द चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे, अभिषेक तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाल, फेटा, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

