shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योगाच्या सान्निध्यात भोसलेवस्ती शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

योगाच्या सान्निध्यात भोसलेवस्ती शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
इंदापूर- भोसलेवस्ती : मॉडेल स्कूल भोसलेवस्ती येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पतंजली योग समिती इंदापूरचे योगगुरू चंद्रकांत देवकर सर व अशोक अनपट सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, विविध योगासने व प्राणायामाचे फायदे समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष योगासने व प्राणायाम करून घेतले.
या उपक्रमात सद्गुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव (ता. कर्जत) येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेऊन योगसाधनेचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका आशा नष्टे, शिक्षक भारत ननवरे, समाधान भोंग, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगामुळे निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैली घडते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
close