श्री शिवाजी विद्यालय बावडा शैक्षणिक संकुल मध्ये सर्व विभागांचा योग दिन संपन्न..
इंदापूर - बावडा: 21 जून श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात आला .निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा संस्थेचे सचिव उदयसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगविद्या जोपासावी असे मत उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले. योगरत्न पुरस्कार प्राप्त योग सेवानिवृत्त योगगुरु दत्तात्रय अनपट , सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय दडस सर सेवानिवृत्त ढुके भाऊसाहेब हे पतंजली योग समिती इंदापूरचे योग गुरु योग प्रशिक्षक म्हणून लाभले.
दत्तात्रय अनपट सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना वेगवेगळी योग प्रात्यक्षिके करून दाखवली व त्याचे महत्त्व पटवून सांगितले.त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी योगाचे प्रशिक्षण घेतले. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दररोज योगा करणे आवश्यक आहे. योगा केल्यामुळे मनाला शांती मिळते तसेच भविष्यात होणाऱ्या रोगापासून तसेच व्यसनापासून मुक्ती मिळते. असे प्रतिपादन योगगुरू अनपट सर यांनी केले. प्राचार्य घोगरे डी आर यांनी प्रास्ताविक केले .
यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा योगा शब्दाची रचना करून प्रतीकाचे सादरीकरण केले. आदरणीय उदयसिंह पाटील यांच्या शुभहस्ते योगरत्न दत्तात्रय अनपट सर यांचा सन्मान करण्यात आला.
प्राचार्य घोगरे डी.आर सर , सुधीर यादव व कदम एस व्ही यांच्या हस्ते दडस सर , ढुके भाऊसाहेब या योग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
योग प्रशिक्षकांच्या समवेत प्राचार्य घोगरे सर, उपप्राचार्य हासे डी व्ही ,पर्यवेक्षक व्यवहारे एस आर , पर्यवेक्षक लोकरे आर बी, मुख्याध्यापक गुरव विनायक सर, सीनियर कॉलेजचे प्राचार्य लहू वावरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य विराज मोहिते, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक घोगरे एस डी ,अध्यापक-अध्यापिका इतर कर्मचारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक मधील सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची योगासने केली. सर्व विद्यार्थ्यांनी या योगासनाचा आनंद घेतला.
या योग दिनाचे सूत्रसंचालन मुलाणी एस.टी. यांनी केले. आभार हासे सर यांनी मांनले सर्व कार्यक्रमाचे छायांकन शेख आरजे व कांबळे अखिल यांनी केले .

