shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगाव तालुक्यातील साखरा येथे चोरी करून वृद्ध महिलेचा खून..!!

हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)➤
दि.१०,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथे दि.१० आँगष्ट सोमवार रोजीच्या मध्यरात्री पाऊस सुरू असताना रात्री १ते ४च्या सुमारास वयोवृद्ध महिला एकटीच घरी राहत असल्याचा फायदा घेत त्या महिलेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास करुन तिचे डोके जमिनीवर आपटत खुन केल्याची खळबळजनक घटना आज दि.११ आँगष्ट मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे.



सदरील महिला चोरीला विरोध करत असल्यामुळे तिचे डोके जमिनीवर आपटत तिला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मनकर्णाबाई तुळशीराम सरुळे असे मयत झालेल्या ७० वर्षीय वृध्द महिलेचं नाव आहे. मनकर्णाबाई यांच्या मुलाचे रिसोड येथे आर्टिकल्स चे दुकान असल्याने मनकर्णाबाई घरी एकट्याच राहत होत्या, आणि याचाच फायदा घेत चोरट्यांनी हा प्रकार घडूनं आणला, सध्या घटनास्थळी सेनगांव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव हे पथकासह दाखल झाले असून अधिक तपास सेनगाव पोलिस करीत आहेत. सध्यातरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसून, चोरीच्या प्रकारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
close