shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या नराधमाला एका वर्षातच शिक्षा..!!


अलिबाग । राजेश बाष्टे :-- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला एका वर्षातच विशेष न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या बाबतचे वृत्त असे की, आरोपी अजय कमलाकर वाघमारे वय २२ वर्षे रा.रोडे काश्मिरे फणसवाडी ता.पेण जि.रायगड याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे. 

सदर प्रकरणातील पिडीत मुलगी वय १६ वर्षे हिच्याबरोबर एप्रिल २०१९ महिन्यात आरोपीने बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मे २०१९ मध्ये रात्री १० वाजण्याचे सुमारास आरोपी पिडीत मुलीला फिरावयास घेउन
जाताना पिडीतेच्या वडीलांनी पाहिले व त्यानी आरोपीला त्यावरुन हटकले तेव्हा आरोपीने पिडीतेच्या वडीलाना उर्मटपणे मी तिच्यावर प्रेम करतो, मी तिच्याशी लग्न करणार आहे असे सांगितले. त्यानंतर दिनांक २१.०५.२०१९ रोजी आरोपीने पिडीतेला पेण येथे बोलावून चवणे आदिवाशीवाडीवर नेऊन तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध केल्यावरुन पिडीतेच्या आईने मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती.

सदरची फिर्याद दाखल झाल्यानंतर सदर केसच्या कामी आरोपी अजय कमलाकर वाघमारे यास दि. ०६/०६/२०१९ रोजी अटक करण्यात आली होती व तेव्हापासून आजतागायत सदरचा आरोपी हा न्यायालयीन कोठडीत होता. सदर खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश व्ही.एम. मोहिते यांचे न्यायालयात झाली. या केसमध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले, सदर गुन्हयातील पिडीत मुलगी, पिडीत मुलीची आई व काका या सर्वांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

 तसेच पैरवी अधिकारी श्रीमती सायगावकर व पोलिस हवालदार सचिन खैरनार  आणि मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्री. ठाकूर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाचे दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राहय धरुन विशेष न्यायालयाने दि.१४ ऑगस्ट २०२० रोजी आरोपी अजय कमलाकर वाघमारे वय २२ वर्षे रा.रोडे काश्मिरे फणसवाडी ता.पेण जि.रायगड रयाला भा.द.वी. कलम ३७६ (२) (आय) (एन) व दि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉम सेक्श्यूअल ऑफेन्स ॲक्ट कलम ३, ४, ५ (जे) (एल), ६, ७, ८ या कलमाखाली १० वर्षे सक्त मजूरी व ५०००/- रु. दंडाची शिक्षा ठोठावली. सदरच्या खटल्याकडे मांडवा परिसरातील तसेच अलिबाग तालुक्यातील लोकांचे लक्ष लागून राहीलेले होते.
close