shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजकीय,शिक्षण,सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण करणारे अष्टपैलू नेतृत्व-विक्रम बप्पा मुंडे..!!



केज । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे)   :- 
केज तालुक्यातील देवगाव येथे विक्रम बाबुराव मुंडे पाटील यांचा जन्म झाला कै.बाबुराव मुंडे  पाटील (वडील) व कै.लक्ष्मीबाई मुंडे पाटील (आई) तर सौ.कृष्णाताई मुंडे (पत्नी) व 02 मुले नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.


विध्यार्थी दशेत असताना अध्ययन काळात घरची परिस्थिती बिकट होती. उपजीविका भागवण्यासाठी विक्रम बप्पानी काही काळ पिठाची गिरणी चालवत आपले शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर त्यांना भूविकास बँकेत नौकरी मिळाली.नौकरी करत करत त्यांनी गोरगरीब, शेतकरी गरजू कुटुंबांना मदत करत समाज सेवेला सुरूवात केली.समाज हे घर आणि जनता हे संसार असे समजून समाजाच्या उद्धारासाठी काम करण्याचे धोरण त्यांनी आखले.शिक्षणामुळेच सर्व माणसे जगात महान बनतात.म्हणून देवगाव आणि परिसरातील तरुण वर्गाला उच्चशिक्षित बनण्यासाठी बीड जिल्ह्यात विशेषता केज तालुक्यात शैक्षणिक जाळे निर्माण करत तालुक्यातील गोरगरीब विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळा-कॉलेज-डी.एड.बी.एड-एम.एड -नर्सिंग शाळा-तंत्र निकेतन-शेतकी शाळा-आश्रम शाळा-मुक्त विद्यापीठ आदिंची स्थापना करूण येथिल युवकांना सर्वच सुविधा उपलब्ध करून देत दिलासा देण्याचे काम केले आहे.

त्यानंतर त्यांनी राजकीय रणांगण गाजवत काही काळ बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले.त्यांच्या कार्यकाळात केज तालुक्यासाठी पाणी,रस्ते,वीज,आरोग्य आणि सिंचन आशा विविध योजना आणून आमूलाग्र बदल केला.शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून विडा परिसराची पिडा दूर करण्यासाठी बप्पानी विशेष प्रयत्न केले.विडा येथे रामकृष्ण विद्यालय आणि रेणुका नर्सिंग स्कुल उघडत येथिल विद्यार्थ्यांना दिलासा दिला तसेच शिवरामपुरी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब व वंचित लोकांना आर्थिक संजीवनी देण्याचे बप्पांनी काम केले आहे.

तर शेतकऱ्यांचे पांढरे सोने तथा कापसास योग्य भाव मिळावा म्हणूनच बरड येथे रेणुका कॉटन इंडस्ट्री उघडत परीसरातील शेतकरीकर्यांना योग्य मोबदला देत न्याय दिल्याने शेतकर्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दोन वर्षापूर्वी दुष्काळ पडल्यामुळे लोकांना पशुधन सांभाळणे कठीण झाले असताना रेणू गूळ इंडस्ट्री धावज्याचीवाडी येथे जनावरांसाठी छावणी सुरू केली.चढ्या भावाने पशुखाद्य खरेदी करून अनेक जनावरे सांभाळले.संकट काळात शेतकऱ्यांना हिम्मत आणि आधार दिल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत आनंद निर्माण झाला.जिकडे जावे तिकडे लोक बप्पाचे आभार मानू लागले.जो लोकांसाठी जगतो तोच मोठा बनतो हे बप्पानी आपल्या कार्यातून सिद्ध केले.

माणसाकडे काम करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता असून देखील पैशाविना प्रगती शक्य नाही.म्हणून 22 वर्षंपूर्वी कृष्णा अर्बन बँकेची केज येथे सुरुवात केली.आज बँकेच्या केज,बीड,कळंब,माजलगाव आणि नांदूरघाट येथे शाखा कार्यरत आहेत.ग्राहकाचा भक्कम विश्वास आणि सहकार्य यामुळे बँक प्रगती पथावर आहेत.

विडा येथे शिवरामपुरी बिगर शेती ग्रामीण पतसंस्थेला सुरुवात केल्यानंतर सदरील पतसंस्थेच्या विडा,येवता,बरड, चिंचोली(माळी),वघेबाभूळगांव या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.कृष्णा बँक आणि पतसंस्था गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहेत.बँक आणि पतसंस्थेच्या माध्यमातून अर्थ साहाय्य दिल्यामुळे सामान्यांच्या जीवनात सुख,समाधान आणि आनंद निर्माण झाला.

समाजात चांगले संस्कार घडावेत आणि विधायक काम व्हावे यासाठी धावज्याचीवाडी येथे रामकृष्ण गडावर रामकृष्ण महाराज आणि स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना केली.उदास रानमाळावर श्रद्धा स्थान निर्माण करून परिसराचे पावित्र्य वाढविले.ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी धवाज्याचीवाडी येथे रेणू गुळ इंडस्ट्रीची सुरुवात केली.साखर कारखान्याच्या बरोबरीने उसास भाव दिला.उसाचे पेमेंट वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले.रामकृष्ण गडावर अनेक उत्सव सतत साजरे केले जातात.  विक्रम बप्पाच्या कार्यावर नजर टाकल्यास विकासासाठी झटणारे आणि झिजणारे नेतृत्व म्हणावे वाटते.त्यांच्या सर्व कार्याचा विचार केल्यास बप्पा राजकीय, शैक्षणिक,सहकार क्षेञात दबदबा निर्माण करणारे अष्टपैलू नेत्रत्व आहेत असेच म्हणावे लागेल.बप्पाच्या कार्यात पत्नी सौ.कृष्णाताई मुंडे,जेष्ठ पुत्र तथा विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे,देवगावचे माजी सरपंच अतुल दादा मुंडे आणि सूना प्राचार्या सौ.माधुरिताई मुंडे,सौ रुपालिताई मुंडे,उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी,कृष्णा बँकेचे मुख्याधिकारी वासुदेवराव मुंडे,शिवरामपुरी पतसंस्थेचे सचिव सुनीता पवार व सर्व कर्मचारी सतत मदत करतात. विक्रम बाप्पांना व त्यांच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो . वाढदिवसानिमित्त बप्पांना कोटी कोटी शुभेच्छा.

शब्दांकन  :-  प्रकाश मुंडे, केज.
close