सावळीविहीर (प्रतिनिधी) :
जगात,देशात ,राज्यात ,कोरोना विषाणुने थैमान घातले असून त्यामुळे सध्या महाराष्ट्रात व अहमदनगर जिल्ह्यातही सर्व उत्सव व सण साध्या पद्धतीने साजरे होत आहे .या कोरोणाच्या संकटकाळात यावर्षीचा गणेशोत्सव आला आहे. दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोणाच्या या काळात हा गणेश उत्सव साध्या पद्धतीने व गर्दी न करता साजरा करण्यात यावा. एक गाव एक गणपती असावा.
यासाठी राहता व कोपरगाव तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ,गणेश प्रेमींनी, नागरिकांनी, शासनाला सहकार्य करावे ,असे आवाहन अति. पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे ,प्रांताधिकारी गोविंद शिंदे , व डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी केले आहे,
शिर्डी येथे आज शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी या वर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा.यासाठी शिर्डी येथे सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी शिर्डीचे विभागीय अधिकारी गोविंद शिंदे ,श्रीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉक्टर दिपाली काळे,तसेच शिर्डीचे पोलीस विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगावचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर ,शिर्डीचे पोलीस निरीक्षक दीपक गंधाले व विविध पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी यावर्षीचा सार्वजनिक गणेश उत्सव कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करून संभाव्य धोके व संभाव्य गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सर्व गणेश मंडळांनी करावा. आपल्या गणेश मंडळामार्फत सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी कोरोना संदर्भात जनजागृतीचे फलक लावावेत. कुठेही विनाकारण गर्दी करू नये. साध्या व शांततेत व उत्सहात हा गणेश उत्सव यावर्षी साजरा करावा .असे आवाहन करण्यात आले व सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकारीनी त्यास मंजुरी देत या वर्षी एक गाव एक गणपती तसेच साध्या पद्धतीने व शासनाचे नियम व कायदा राखून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. या वेळी सोशल डिस्टंन्स पाळत व सर्व शासकीय व पोलीस अधिकारी व गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी मास्क बांधुनच या बैठकीला हजेरी लावली.
यावेळी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे यांनी उपस्थित सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,कोरोनाच्या या संकटकाळात शासनाने ठरवून दिलेल्या नियम व कायदा अबाधित राखण्यासाठी प्रत्येक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व गणेश प्रेमींनी तसेच नागरिकांनीही ही शासनाला सहकार्य करावे.नियम व कायदे मोडणांयांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यावेळी इतर अधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले व सूचना केल्या .याबैठकीला राहता व कोपरगाव तालुक्यातील पोलीस अधिकारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

